Press "Enter" to skip to content

एसिपी सुरेखा कपिले यांना “कोरोना योद्धाने” सन्मानित

सिटी बेल लाइव्ह । रसायनी । राकेश खराडे ।

मुंबई- बोरीवली दहीसर येथील सहाय्यक पोलीस आयुक्त -वाहतुक,मुंबई बिएससी -एलएलबी , एमपीएससी स्पर्धा परीक्षेत महाराष्ट्रातून पिएसआय पदावर प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण ,बास्केटबॉल नॅशनल खेळाडू अॅथलॅटिक्स ५ वर्ष चॅम्पियनशिप ,समाजातील महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सहकार्य,कायदेविषयक मार्गदर्शन देणे,श्री संत नरहरी महाराज लाड सुवर्णकार संस्था,त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र राज्य विश्वस्त सहसचिव म्हणून कार्यरत,पोलीस खात्यात केलेल्या कामाबद्दल अनेक पुरस्कारांनी सन्मानित,ठाणे येथील ओम लाड सुवर्णकार संस्थेतर्फे समाज भुषण पुरस्काराने सन्मानित अशी ओळख असलेल्या एसीपी सुरेखा कपिले यांना पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने पदाधिकारी सिकंदर शेख यांच्याहस्ते "कोरोना योध्दाने"सन्मानित करण्यात आले. दरम्यान नवी मुंबई व मुंबई येथील वेगवेगळ्या पोलीस स्टेशन व शाखेत कार्य केले जुहू पोलीस ठाणे,विमानतळ सुरक्षा विभाग,गुन्हेशाखा, गुन्हे,बलात्कार,खून,अपहरण,दरोडे,चोरी इ.गुन्हाची चौकशी करण्यात माहिर असणा-या एसिपी सुरेखा कपिले यांना "कोरोना योध्दा"ने सन्मानित करण्यात आले.

एसिपी सुरेखा कपिले यांनी गुन्हेशाखेत असतांना ३ गवळी गँगच्या गुंडाचा चकमकीत ठार मारले. अशा बहुआयमी व अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या एसीपी सुरेखा कपिले यांना पश्चिम महाराष्ट्र एज्युकेशन ट्रस्टच्यावतीने''कोरोना योद्धाने" सन्मानित करण्यात आल्याने त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.