Press "Enter" to skip to content

जिना यहाँ मरना यहाँ काँग्रेस के सिवा जाना कहा?- महेंद्रशेठ घरत

नाराजी दूर ठेऊन, आघाडी धर्म पाळत महेंद्रशेठ घरत प्रचारात सक्रिय

पत्रकार परिषदेतून महेंद्रशेठ घरत यांनी दिला महाविकास आघाडीचे लोकसभेचे उमेदवार संजोग वाघेरे तसेच अनंत गिते यांना जाहीर पाठिंबा.

प्रतिनिधी/ शेलघर
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा कामगार नेते महेंद्र घरत यांनी जिना यहाँ मरना यहाँ काँग्रेस के सिवा जाना कहा? असे म्हणत लोकसभा निवडणुकांच्या प्रचाराच्या रणधुमाळीत काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व ताकद पणाला लावेल असे रणशिंग फुंकले आहे. नाराजी असली तरी ती दूर लोटत सर्वसामान्य नागरिकांसाठी आणि सर्व जातीपंथांसाठी सर्वसमावेशक राजकारण करणाऱ्या काँग्रेस पक्षाचे हात मजबूत करण्यासाठी प्रचारामध्ये सक्रिय होत असल्याची भूमिका महिंद्र घरत यांनी मांडली.
       मावळ व रायगड मधील उमेदवारांना  बहुमताने निवडून आणण्यासाठी काँग्रेसचा प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्ता कामाला लागला असून संजोग वाघेरे व अनंत गिते यांना बहुमताने निवडून आणण्यासाठी प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अधिक जोमाने कामाला लागा. संजोग वाघेरे व अनंत गिते लोकसभेच्या निवडणुकीत बहुमताने निवडून येतील असे प्रतिपादन महेंद्र घरत यांनी शेलघर येथे केले.

       रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे  मंगळवार दि १६ एप्रिल २०२४ रोजी समाज मंदिर हॉल, शेलघर, तालुका उरण येथे सकाळी ११ वाजता बैठक व पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कामगार नेते,काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत बोलत होते. या प्रसंगी व्यासपिठावर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, रायगड जिल्हा काँग्रेस कमिटी महिला आघाडी अध्यक्षा श्रद्धा ठाकूर,मच्छिमार नेते मार्तंड नाखवा, रायगड जिल्हा उपाध्यक्ष किरीट पाटील,अल्पसंख्यांक विभागाचे अखलाक शिलोत्री, महाराष्ट्र प्रदेश सदस्य डॉ.मनिष पाटील, जिल्हा सरचिटणीस रामनाथ पंडित,रायगड जिल्हा युवक अध्यक्ष निखिल ढवळे,रायगड जिल्हा पर्यावरण सेल जिल्हाध्यक्ष राजीव पाटील,रायगड जिल्हा महिला अध्यक्षा ऍड. श्रद्धा ठाकूर,महिला उरण तालुका अध्यक्षा रेखा घरत, उपाध्यक्ष निर्मला पाटील, उरण तालुकाध्यक्ष विनोद म्हात्रे,पनवेल तालुका अध्यक्ष नंदराज मुंगाजी,खालापूर तालुका अध्यक्ष कृष्णा पारांगे,खोपोली शहराध्यक्ष रिचर्ड जॉन,कर्जत तालुकाध्यक्ष संजय गवळी,पेण तालुका अध्यक्ष अशोक मोकल,रोहा तालुका अध्यक्ष सुनील देशमुख,महाड तालुका अध्यक्ष अफजल चांदले,नागोठणे शहराध्यक्ष अशपाक पानसरे,सुधागड पाली तालुका अध्यक्ष बाबा कुलकर्णी आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना महेंद्र घरत म्हणाले की भिवंडी लोकसभा काँग्रेस पक्षाला सोडण्यात यावी यासाठी मी तसेच  काँग्रेस पक्ष आग्रही होते. मात्र ती जागा दुसऱ्याला गेली. लोकसभेला मावळ मतदार संघात  शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार निवडणुकीत उभे आहेत.काँग्रेसला आशा होती की कोकणात लोकसभेसाठी काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळेल पण तसे झाले नाही. तरी विधानसभेला आम्हाला सन्मान जनक जागा मिळतील अशी अपेक्षा करतो. मशाल आणि तुतारी हे नवीन चिन्ह आहेत. मात्र काँग्रेसचे चिन्ह हात हे सर्वांत जुने चिन्ह आहे. त्यामुळे ते लोकांच्या कायमचे लक्षात आहे. असे असले तरी राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वच उमेदवार निवडून येण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे. इंडिया आघाडी जिंकायला पाहिजे असे महाविकास आघाडीचे तसेच सर्वसामान्य जनतेचे मत आहे. आज मोदी सरकार विरोधात प्रचंड संताप आहे. या मोदीसरकार विरोधी लाटेचा फायदा महाविकास आघाडीच्या प्रत्येक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी घेतला पाहिजे.माजी खासदार तथा महायुतीचे लोकसभेचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी मावळ लोकसभा मतदार संघात कोणतेही कामे केली नाहीत. जनतेशी संपर्क ठेवला नाही. त्यामुळे त्यांचा पराभव निश्चित आहे. मोदी विरोधी लाट असल्यामुळे संजोग वाघेरे निवडून येतील. देश वाचला पाहिजे, संविधान टिकला पाहिजे अशी नेते राहुल गांधी यांची इच्छा आहे त्यामुळे मावळ व रायगड मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांना बहुमताने निवडून आणण्यासाठी सर्वांनी जोमाने कामाला लागा असे आवाहन महेंद्र घरत यांनी पत्रकार परिषदेत केली.या पत्रकार परिषद मुळे जनतेच्या मनातील भ्रम दूर झाला असून काँग्रेस सारख्या महाबलाढ्य पक्षाचा रायगड व मावळ मधील उमेदवारांना  पाठिंबा मिळाल्याने संजोग वाघेरे व अनंत गिते यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.