मंदार काणे एंटरटेनमेंट ने केले होते ज्वेलरी फॅशन शोचे आयोजन
पनवेल/ प्रतिनिधी
पु ना गाडगीळ अर्थात पी एन जी ज्वेलर्स आणि मंदार काणे एंटरटेनमेंट यांच्या वतीने नुकतेच येथील खांदा कॉलनी मध्ये ज्वेलरी फॅशन शो चे आयोजन करण्यात आले होते. नव्यानेच लाँच झालेल्या सप्तम कलेक्शन चे नेत्रदिपक कलाकुसर केलेले दागिने लेऊन मॉडेल्सनी रॅम्प वॉक केले. या फॅशन शोमध्ये महाराष्ट्रभरातून आलेल्या ५० पेक्षा अधिक मॉडेल्सनी सहभाग नोंदविला होता. शुक्रवार दिनांक १९ एप्रिल रोजी पनवेल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मंदार काणे आणि तुषार सप्रा यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना सांगितले की या फॅशन शोला आणि पीएनजी च्या सप्तम कलेक्शनला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
खांदा कॉलनी मध्ये झालेल्या पी एन जी फॅशन शो दोन कॅटेगरीमध्ये आयोजित करण्यात आला होता. यात मिस कॅटेगरी मध्ये पलक सोहोनी अंतिम विजेती ठरली. फर्स्ट रनर अप तेजल सूर्याजी तर सेकंड रनर अप स्वाती शुक्ला यांना घोषित करण्यात आले.मिसेस कॅटेगरीमध्ये श्रद्धा ने अंतिम विजेतेपद पटकावले. पहिल्यांदाच ज्वेलरी फॅशन शोमध्ये सहभागी झालेल्या पनवेलच्या सेजल देशमुख या फर्स्ट रनर अप ठरल्या.तर दिपा पुण्यार्थी सेकंड रनर अप ठरल्या.
अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने नियोजन करणाऱ्या मंदार काणे एंटरटेनमेंट या इव्हेंट ऑर्गनायझर्सचे तमाम मॉडेल्स आणि पीएनजी ज्वेलर्सच्या वतीने मुक्तकंठाने प्रशंसा करण्यात आली. वास्तविक ज्वेलरी फॅशन शो ऑर्गनाइज करणे हे एक आव्हानात्मक काम आहे. परंतु मंदार काणे यांचा या क्षेत्रातील प्रदीर्घ अनुभव आणि निष्णात टीमने ते लिलया साध्य करून दाखवले. पीएनजी ज्वेलर्सचे पनवेल एरिया मॅनेजर तुषार सप्रा यांनी त्यांच्या सगळ्या शोरूम मध्ये सप्तम कलेक्शन ग्राहकांना विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. या कलेक्शन मध्ये दोन व्हेरिएंट असून सात निरनिराळ्या पद्धतीच्या डिझाईनचे एकत्रीकरण केल्यामुळे या कलेक्शनला सप्तम असे नाव दिले आहे. ते पुढे म्हणाले की या कलेक्शनची ब्रँड ॲम्बेसिडर ही सुप्रसिद्ध सिनेतारका माधुरी दीक्षित असून ग्राहकांचा सप्तम कलेक्शनला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
Be First to Comment