Press "Enter" to skip to content

संक्रमण कमी पण मृत्युत वाढ : उरणमध्ये ४ पॉझिटीव्ह तर २ मृत


सिटी बेल लाइव्ह । उरण । घन:श्याम कडू । 🔷🔶🔷

उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. ही उरणकरांसाठी समाधानकारक गोष्ट आहे. आज दिवसभरात फक्त ४ जण पॉझिटीव्ह सापडले आहेत. तर ४ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आज २ मयत झाले आहेत.
आज एकूण पॉझिटीव्ह २०४९, उपचार करून बरे झालेले १८४६, उपचार घेणारे ९४, मयत १०९ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज गोवठणे १, नवीन शेवा १, नागाव १, जेएनपीटी १ असे एकूण ४ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. जेएनपीटी १, उरण २, मोठीजुई १ असे एकूण ४ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर कोटनाका येथील २ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा कमी होत चालला आहे. तर उपचार घेऊन घरी परत येण्याची आकडेवारी बऱ्यापैकी आहे. मात्र कोरोनाने मयताचा आकडा वाढताना दिसत असल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.