Press "Enter" to skip to content

या मावळ्यांचा विक्रम वाचलात का?…वाचून थक्क व्हाल!

20 तासात 11 वेळा सिंहगड सर

दुर्गतज्ञ, इतिहासक,महाराष्ट्र राज्य दुर्ग संवर्धन समिती चे सदस्य,छत्रपती शिवाजी महाराजांचे पायदळ प्रमुख सरनौबत पिलाजी राव गोळे यांचे 14 वे वंशज मारुती राव गोळे अर्थात आमचे प्रिय मित्र आबा.या आसामी चे सोबत वावरणे सुद्धा थेट इतिहासात घेऊन जाते.484 वेळा सिंहगड आणि 850 पेक्षा जास्त गड सर करणारा हा अवलिया म्हणजे इतिहासाचं चालत बोलतं इंसायकोपिडीया आहे.शंका तुमची आणि संदर्भ आबांचे! अशी जुगलबंदी रंगली की वेळ कुठे जातो तेच कळत नाही

शिव विचारांनी प्रेरित होत आणि पायदळ एक वादळ ही थीम जागवत आबा नवनवीन विक्रमांना गवसणी घालत आहेत.

यावेळच्या विक्रमाला दस्तुरखुद्द आबांनी शब्दबद्ध केले आहे…

चला तर अनुभवू आबांचा पराक्रम त्यांच्या स्वलिखितात.

20 तासात 11 वेळा सिंहगड
सर्व दुर्ग मित्रांनो नमस्कार
आज माझ्या अत्यंत जवळचा मित्र, खडकवासला गावचे अजून एक भूषण मंदार दादा मते पाटील उर्फ आमचा चपळ चित्ता याचा वाढदिवस आहे

आता वाढदिवस ट्रेकर मित्राचा अन त्यात तो म्हणजे चपळ चित्ता म्हणजे काहीतरी ऍक्टिव्हिटी झालीच पाहिजे ना!!

मग मागच्या विक मध्ये मी ठरवलं की 11 तारीख ना मग 11 वेळा सिंहगड करायचा

आता सलग 11 वेळा सिंहगड करणे तसं सोपं नव्हतं पण अशक्य सुद्धा नाही

मग ही गुपित कल्पना प्रेरणादायी दिगग्ज दिग्विजय नाना अन अनिल बाप्पू यांना सांगितली त्यांनी लगेचच होकार दिला,

आता आशा ऑक्टोबर महिन्यात हिट मध्ये सिंहगड 11 वेळा सर करायचं म्हणल्यावर तयारी आली, पाणी, वैगरे अगोदरच पिणे चालू केले होते

सहकारी जमवले कारण सांघिक कामगिरी काराची होती इकडे इतिहास संशोधक अशोक सरपाटील अन मावळात ढाण्या वाघ गणेश जाधव ला सहकारी ना अनायकला सांगितले होते

सरतेशेवटी 10 ऑक्टोबर 2020, शनिवार उजडला,
पहाटे 4 ला आतकर वाडीत सर्वजण हजर होते
मी, चपळ चित्ता, प्रेरणादायी दिग्विजय नाना जेधे, नियोजनकार अनिल बाप्पू पवार, ढाण्या वाघ गणेश जाधव, इतिहास संशोधक अशोकराव सरपाटील, बब्बर शेर विनायकराव दारवटकर,सहकारी स्नेही अँड राजेश सातपुते, प्रसिद्ध ट्रेनर हनुमंत जांबुळकर,कॉलेज मधील मित्र प्रसिद्ध पैलवान शेखर जावळकर पाटील,भलामाणुस राजाभाऊ तिखे, शिवबाचा मावळा जाकीर सय्यद, दुर्गमित्र हरीश गवई, हरीश मते पाटील, दारवली गावचे मुलकी पाटील सागर थरकुडे पाटील, दुर्गमित्र चैतन्य बोडके ,स्नेही ऋषिकेश वांजळे पाटील अशी भरभक्कम टीम जमली

शिवाघोष गर्जना करत सिंहगड सुरुवात केली
नेहमी शॉर्टकट्स ने जाणारे आम्ही आज टप्पा मोठा असल्याने शॉर्टकट घेतला नाही

मजल दरमजल करत 1 वेळा 2 वेळा करत करत हट्रिक साधली मग जसजसे मित्र थकत होते तसतसे ते थंबत होते
काल सगळ्यांचे रेकॉर्ड झाले
कोणाचा 3 वेळा तर कोणाचा 5 वेळा तर कोणाचा 7 वेळा तर कोणाचा 9 वेळा अशी कामगिरी बजावली होती

अगदी सुरवातीला 41 मिनिट ते 11 व्या ला 66 मिनिट लागले

पावसाने हजेरी लावून आम्हला प्रेरणा मिळाली

माझ्या Strava अप वर 56 किलोमीटर सह 5560 एलिवेशन दाखवले
एक जीवनातील सर्वोच्च कामगिरी काल पार पडली

मग रात्री नेहमी प्रमाणे नरवीर सुभेदार तान्हाजी मालुसरे यांचे वंशज महेश दादा मालुसरे अन त्यांचे सहकारी तसाच आमचा लाडका ओमी गडावर आले, दादांनी तर चक्क आम्हला नरवीर तान्हाजी मालुसरे यांची मूर्ती देऊन सन्मान केला, तसेच या आगळ्यावेगळ्या ट्रेक ला माझे सिंहगड चे नेहमीचे हॉटेल धारक राजू चिव्हे, सडकेचे मेट वरील दत्ता, पप्पू, उघडे मावशी अन गडावर देव टाक्यातील पाणी पुरवले असे कोंढवे धावडे चे किशोर चौधरी याच भाऊ चौधरी यांच मनापासून आभार

जीवनात काहीतरी वेगळे नक्कीच करत जावा

माझ्या जिवाभावाचया मंदार उर्फ चपळ चित्ता ला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐🎂

सिंहगड नाबाद 484 आता लवकरच 500 कडे वाटचाल करतोय..

काय वाचकमित्रहो आहे ना भन्नाट अनुभव!

लवकरच तुमच्या साठी घेऊन येत आहोत मारुती राव गोळे यांचे भन्नाट अनुभव..

त्यासाठी वाचत रहा सिटी बेल लाईव्ह..

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.