Press "Enter" to skip to content

आदि-विमल पारणा महोत्सव २०२६ : खोपोलीत वर्षीतपाच्या तपश्चर्येचा दिव्य सोहळा


खोपोली प्रतिनिधी : दिनकर भुजबळ

खोपोली नगरीत आदि-विमल पारणा महोत्सवानिमित्त भक्ती, श्रद्धा आणि संस्कारांचा अद्वितीय संगम अनुभवायला मिळाला. जैन धर्मातील अत्यंत कठीण आणि पवित्र मानल्या जाणाऱ्या वर्षीतपाच्या निमित्ताने संपूर्ण शहरात आध्यात्मिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
वर्षीतप हे जैन धर्मातील सर्वोच्च तपांपैकी एक मानले जाते. भगवान ऋषभदेव (आदिनाथ) यांनी केलेल्या दीर्घकालीन उपवासाच्या स्मरणार्थ ही परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी ऊसाचा रस घेऊन पारणा करून या तपश्चर्येची सांगता केली जाते.
यंदा खोपोलीतील ६५ पुण्यशाली तपस्वींनी हे कठोर वर्षीतप पूर्ण केले असून, २० एप्रिल रोजी त्यांचा पारणा मोठ्या भक्तिभावात संपन्न झाला. या निमित्ताने आयोजित आदि-विमल पारणा महोत्सवाने शहरात एक दिव्य आणि शांत आध्यात्मिक वातावरण निर्माण केले.

या प्रसंगी आमदार महेंद्र थोरवे, माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे, केतन शेंडे, बाबुबाई ओसवाल, हेमंत नांदे, मोहन औसरमल, खोपोली पोलीस निरीक्षक सचिन हिरे तसेच विविध क्षेत्रांतील असंख्य भाविकांनी गगनगिरी महाराज आश्रम येथे उपस्थित राहून दर्शन घेतले.
यावेळी पूज्य शांतनप्रभावक आचार्य देव श्री विजय लब्धिप्रभ सूरीश्वरजी म.सा. तसेच पूज्य नूतन आचार्य भगवंत श्री विजय जयप्रभ सूरीश्वरजी म.सा. (जे.पी. गुरुदेव) यांच्या पवित्र सान्निध्यात उपस्थित राहण्याचा योग लाभला. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून उपस्थितांना सकारात्मक ऊर्जा आणि जीवनमूल्यांची नवी दिशा मिळाली.
या भव्य सोहळ्याचे उत्कृष्ट नियोजन करणाऱ्या आयोजकांनी समन्वय आणि व्यवस्थापनाचे उत्तम उदाहरण सादर केले. त्यांच्या अथक परिश्रमामुळे हा महोत्सव यशस्वी आणि संस्मरणीय ठरला.

वर्षीतप सेवा (योगदानकर्ते):
शा. सुभाष उमेदमलजी पोरवाल, शा. राजेंद्र तिलोकचंदजी जैन, शा. चंदनमलजी रतनचंदजी जैन, शा. अजित शांतिलालजी ओसवाल, शा. रणजीत ओटरमलजी ओसवाल, शा. राजेंद्र भुरमलजी ओसवाल, शा. मुकेश फुटरमलजी पोरवाल, शा. विपुल चंदनमलजी जैन, शा. मुकेश संपतराजजी जैन, शा. ललित सोहनराजजी सेमलानी , शा. अल्पेश सूर्यकांतभाई शाह, शा. चिराग ललितजी जैन, शा. उत्तम शांतिलालजी बोराणा, शा. दिलीप कपूरचंदजी ओसवाल, शा. बंटी पोपटजी पोरवाल, शा. रवि अशोकजी जैन, शा. निशांत चंपालालजी पोरवाल, शा. मुकेश हस्तीमलजी ओसवाल.

आदि-विमल पारणा महोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा नसून आपल्या परंपरा, संस्कार आणि सांस्कृतिक वारशाचे जिवंत प्रतीक आहे. अशा पवित्र प्रसंगांमुळे समाजातील एकात्मता अधिक दृढ होते आणि पुढील पिढ्यांना आपल्या संस्कृतीचा अभिमान जपण्याची प्रेरणा मिळते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.