Press "Enter" to skip to content

भांडुप येथे भव्य आगरी वधु -वर मेळाव्याचे आयोजन



मुंबई प्रतिनिधी:(सतिश पाटील )

सध्या लग्न सराईचे दिवस सुरु आहेत… घरोघरी पालक, नातेवाईक आपल्या मुलांसाठी सुयोग्य वधु वा वर शोधण्याच्या तयारीला लागलेले दिसतात… पालकांचा हा लग्नाचा ताण हलका करून त्यासाठी सहकार्य करायला मुंबईतील आगरी समाज विकास संघ दरवर्षी वधु वर मेळावे भरवून समाजकार्य करण्याचे काम करीत असतो…हाच हेतू समोर ठेऊन आगरी समाज विकास संघ, मुंबई व स्व. दीना बामा पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य आगरी वधु -वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे…

सदर मेळावा रविवार दि.२६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता स्व. दीना बामा पाटील प्रतिष्ठान, भांडुप स्टेशन रोड, भांडुप (पश्चिम ), मुंबई याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे… या कार्यक्रमासाठी वधू वर यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे… सोबत नवीन उमेदवार असेल तर ३ बाय ४ चे दोन फोटो, तसेच उमेदवाराची जुनी नोंद असल्यास संस्थेने दिलेली नोंदवही आणण्याची सूचना करण्यात आली आहे…या मेळाव्यासाठी आगरी समाजातील इच्छुक वधु – वर उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे… अधिक माहितीसाठी धनाजी म्हात्रे- 98690 07754, सागर पाटील- 97735 29747, संजय म्हात्रे- 99679 72206, श्याम नाकटे- 99696 20057 यांच्याशी संपर्क साधावा…

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.