Press "Enter" to skip to content

‘सुदर्शन केमिकल्स’तर्फे जिल्हा परिषद शिक्षकांसाठी वेबिनार

‘बदलते शालेय शिक्षणाचे स्वरूप व तंत्रज्ञान’ या महत्वपूर्ण विषयावर वेबिनार 🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह । धाटाव । शशिकांत मोरे । 🔶🔷🔶


कोरोना महामारीमुळे राज्यातील शिक्षण व्यवस्था विस्कळीत झाली असून, अनेक ठिकाणी ऑनलाईन शिक्षण देण्यास सुरुवात झाली आहे. अशावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांतील शिक्षकांना प्रोत्साहन देणे, नविन शिक्षण पद्धतींचा अवलंब करणे गरजेचे आहे. हीच गरज ओळखून रायगड जिल्हा परिषद, सुदर्शन केमिकल्स इंडस्ट्रीज आणि सुदर्शन सीएसआर फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केले आहे. येत्या गुरुवारी (ता. ८) सकाळी ११ ते १ या वेळेत झूम मीटद्वारे हा वेबिनार होणार आहे.

‘बदलते शालेय शिक्षणाचे स्वरूप व तंत्रज्ञान’ या विषयावर हा वेबिनार होणार आहे. राज्यमंत्री तथा रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, सुदर्शन केमिकल्स सामाजिक बांधिलकी व मानव संसाधन विभाग प्रमुख शिवालीका पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. प्रसिद्ध वक्ते व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे सहआयुक्त अनिल गुंजाळ, पुण्यातील सुपरमाईंड फाउंडेशनच्या संस्थापिका समुपदेशिका श्रीमती मंजुषा वैद्य यांचे प्रमुख मार्गदर्शन असणार आहे. या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी

https://zoom.us/j/98741484862?pwd=K0xmQTloMVJ3aW1jQWdKZEFEOEM4UT09

या लिंकवर भेट द्यावी, असे आवाहन संयोजिका माधुरी सणस यांनी केले आहे.

More from UncategorizedMore posts in Uncategorized »

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.