Press "Enter" to skip to content

उरणमध्ये लॉकडाऊन कडकडीत माञ जेएनपीटी परिसर सुसाट

सिटी बेल लाइव्ह / उरण(घन:श्याम कडू) #

उरणमध्ये कोरोना कोविड १९ चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरणला ४ दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला आजपासून सुरुवात झाली आहे. उरणशहरात लॉकडाऊन पूर्णपणे यशस्वी झाला आहे. परंतु जेएनपीटी परिसरातील सर्व कंपन्या व गोदामे सुरू होती. त्यामुळे या ठिकाणी सर्व सुरळीत सुरू होते. त्यामुळे उरणमध्ये लॉकडाऊन कडकडीत तर जेएनपीटी परिसर सुसाट अशी म्हणण्याची वेळ उरणकरांवर आली आहे.
उरणमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने होताना दिसत आहे. दररोजच्या आकडेवाडीत वाढ होताना दिसत आहे. आता सर्वाधिक कोरोना पॉजेटीव्ह हे कंपन्यामध्ये आढळू लागले आहेत. ज्या कंपन्यामध्ये कोरोना पॉजेटीव्ह सापडत आहेत. त्या कंपन्यांची नावे जाहीर करण्याची मागणी प्रशासनाकडे करूनही अद्यापपर्यंत कुठल्याच कंपन्यांची नावे प्रशासनाने जाहीर केली नाहीत. यामागे काय कारण आहे ते समजत नसल्याचे उरणच्या जनतेत बोलले जात आहे.
कोरोनाचा प्रसार हा कंपन्यांमुळेच गावोगावी पसरला आहे. त्यामुळे नेहमीच प्रसिद्ध होणाऱ्या आकडेवारीत पॉजेटीव्हचा आकडा वाढताना दिसत आहे. या वाढत्या पॉजेटीव्ह आकड्याला आळा घालण्यासाठी आजपासून म्हणजे सोमवार दि. १३ जुलैपासून गुरुवार १७ जुलैपर्यंत उरण लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्या निर्णयांची आजपासून अंमलबजावणी सुरू झाली आहे.
उरण शहरात आज कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात आला आहे. तर अत्यावश्यक सेवा म्हणून जेएनपीटीसह सर्व बंदरे, कंपन्या व गोदामे सुरळीत सुरू होती. त्यामुळे त्याठिकाणी वर्दळ नेहमीप्रमाणेच होती. कामगार वर्ग नियमांचे उल्लंघन करीत असल्याचे समजते. परंतु या कंपन्या व बंदरातून कोरोना पॉजेटीव्हचा आकडा उरणमध्ये वाढताना दिसत आहे. या वाढत्या पॉजेटीव्हला आळा घालण्यासाठी लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र ज्या ठिकाणी कोरोना पॉजेटीव्ह पेशंट जास्त सापडत आहे. तो सर्व भाग सुरळीत सुरू मग कोरोनाला आळा बसेल का? तसेच असे करून उरणमध्ये पाळण्यात येत असलेल्या लॉकडाऊनचा फायदा होण्याऐवजी कोरोना पॉजेटीव्हचा आकडा वाढण्याची शक्यता नाकारता येत नसल्याची चर्चा उरणच्या जनतेत सुरू आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.