नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा नववा वर्धापन दिन ३ आॅक्टोबरला 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : 🔶🔶🔷🔷
नागोठणे शहर व ग्रामीण विभागात आपल्या स्थापनेपासून सातत्य ठेवत, विविध उपक्रम राबऊन नावलौकिक प्राप्त केलेल्या नागोठणे ग्रामीण विभाग पत्रकार असोसिएशनचा नववा वर्धापन दिन शनिवार दि. ३ आॅक्टोबरला सायंकाळी ६.०० वाजता नागोठणे बाजारपेठेतील आराधना भवन हाॅल, येथे संपन्न होत आहे.
यानिमित्त नागोठण्यातील पत्रकार उदय भिसे यांना संघटनेचा मानाचा कै. तात्यासाहेब टके ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. याचबरोबर रोहा येथील पत्रकार अल्ताफ चोरडेकर यांना उत्कृष्ठ पत्रकार पुरस्कार तर गुहागर (रत्नागिरी) येथील पत्रकार उमेश शिंदे यांना युवा पत्रकार पुरस्कार देऊन संघटनेतर्फे गौरविण्यात येणार आहे.
रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली व त्यांच्याच हस्ते होणारा हा कार्यक्रम रायगडच्या पालक मंत्री ना.कु. आदितीताई तटकरे व आ. अनिकेतभाई तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य व कोकण म्हाडा(राज्यमंत्री दर्जा) मा. सभापती बाळासाहेब पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे मा. सदस्य नरेंद्रशेठ जैन, दै. पुढारीचे रायगड, ठाणे व पालघरचे निवासी संपादक शशिकांत सावंत, ठाणे येथील मराठी उद्योजक डाॅ.जितेंद्र खेर, मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धनभाई पोलसानी, शिवसेना उपजिल्हा प्रमुख व पेण पं.स.चे सदस्य नरेश गावंड, कुणबी समाज रोहा तालुका अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे, राष्ट्रवादीचे नागोठणे विभाग अध्यक्ष सदानंद गायकर, नागोठण्याचे मा. सरपंच विलास चौलकर, भाजपाचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष राजेश मपारा, काँग्रेसचे रोहा तालुका अध्यक्ष निजामभाई सय्यद, नागोठण्याचे मा. सरपंच लियाकतशेठ कडवेकर, भाजपाचे रायगड जिल्हा मा. उपाध्यक्ष किशोरभाई म्हात्रे, शेकापचे ज्येष्ठ कार्यकर्ते नारायण भोईर (गुरुजी) आदिंसह आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
या वर्धापन दिनानिनिमित्त संघटनेच्या “संकल्प” या स्मरणिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन तसेच नागोठणे विभागात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कारही संघटनेतर्फे मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वर्धापन दिनाची जय्यत तयारी संघटनेचे संस्थापक कार्याध्यक्ष शामकांत नेरपगार व अध्यक्ष अॅड. महेश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष धम्मशील सावंत, सचिव अॅड. विजयपाल सावंत, खजिनदार किशोर कदम, सह सचिव राजेंद्र जोशी, सदस्य विनोद भोईर, अनिल पवार, सुनील कोकळे, दिनेश ठमके, चेतन टके, सचिन नेरपगार, राजेश पिंपळे यांच्याकडून सुरु आहे.








Be First to Comment