
पनवेल, दि.१३ (वार्ताहर) : अखिल भारतीय काँग्रेस कमिटी एससी विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र पाल गौतम तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस एससी विभागाचे अध्यक्ष अनिरुद्ध वनकर यांच्या आदेशानुसार संतोष शरद पवार यांची पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी (एससी विभाग) जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा डॉ. श्रुतीताई शाम म्हात्रे यांच्या हस्ते संतोष पवार यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी मा.नगरसेविका शशिकला सिंग यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. या नियुक्तीमुळे पनवेल शहरातील अनुसूचित जाती विभागाच्या संघटनात्मक बांधणीला अधिक बळ मिळेल, तसेच पक्षाची भूमिका आणि जनसंपर्क अधिक प्रभावीपणे राबविण्यास मदत होईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
नियुक्तीनंतर संतोष पवार यांनी पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत, संघटन मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी कटिबद्धपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.



Be First to Comment