सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔷🔶
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह २ जण सापडले आहेत. ४९ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. आज २ जण मयत झाले आहेत.
आज एकूण पॉझिटीव्ह १८४९, उपचार करून बरे झालेले १६११, उपचार घेणारे १४३, मयत ९५ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.
आज विंधणे १, पिरकोन १ असे फक्त २ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. नवीन शेवा २, सेकटर ३ बी ४७ १, पाणदिवे १, पांडुरंग बालाजी रोड ४, जासई १, जसखार १, कोप्रोली १, जांभूळपाडा १, केगाव २, जसखार १, नवापाडा १, तेलीपाडा १, मोरा कोळीवाडा १, टाऊनशीप ४, हनुमान कोळीवाडा २, उरण ३, चिरले २, मुळेखंड तेलीपाडा १, द्रोणागिरी १, कोटनाका २, धुतुम ३, चिरनेर १, फुंडे २, द्रोणागिरी १, नागाव ३, मुळेखंड १, गोवठणे १, पाणजे ४ असे एकूण ४९ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर नवीन शेवा १, पिरकोन १ असे २ जण कोरोनाने मयत झाले आहेत.
आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा कमी होऊन तो फक्त २ वर आला आहे. तर उपचार करून घरी सोडण्यात आलेल्यांचा आकडा वाढून तो ४९ पर्यंत गेला आहे. मात्र २ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण कायम आहे.








Be First to Comment