सिटी बेल लाइव्ह / नागोठणे / याकुब सय्यद 🔶🔷🔷🔶
मनसे आमदार राजू दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त नागोठणे पोलीस स्थानकातील पोलीस बांधवाना मास्क वाटप करण्यात आले.
कोरोनाच्या वाढत्या महामारीत कोरोना पासून नागरिकांच्या जीविताचे स्वरंक्षण करताना स्वता :च्या जीवाची बाजी ज्यांनी लावली असे आपले पोलीस बांधव जे अविरत सेवा बजावत असतात. अश्या कोविड योद्धाना मास्क वाटप करून एक सामाजिक बांधिलकी मनसे ने जपली आहे.
आमदार राजू दादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे रायगड दक्षिण जिल्हा अध्यक्ष देवेंद्र गायकवाड व मनसे जिल्हा संपर्क अध्यक्ष दिलीप सांगळे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळेस साईनाथ धुळे -अध्यक्ष रोहा तालुका मनसे, विनायक तेलंगे अध्यक्ष -रोहा तालुका मनसे माथाडी सेना, नरेश भांडारी मनसे माथाडी सेना, मनोज पारंगे – महाराष्ट्र सैनिक, संतोष यादव – महाराष्ट्र सैनिक, सुनील कदम महाराष्ट्र सैनिक, संतोष ठाकूर महाराष्ट्र सैनिक आदी उपस्थित होते.








Be First to Comment