सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / विकास पाटील 🔶🔷🔷🔶
कोरोनाच्या महामारीत आपल्या सहकारी बंधू व भगिनींच्या जीवाचे संरक्षण करताना कळंबोली वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड यांच्या प्रयत्नातून आज ( दि 29 ) कोविड 19 च्या अनुसंघाने सर्व कर्मचा-याच्या अँटीजेन चाचण्या करण्यात आल्या. त्यामुळे पोलिस कर्मचा-याकडून कुटूंब प्रमुख सतिश गायकवाड यांच्या बाबात आदर व्यक्त होत आहे.
कोरोनाचा वाढता धोका लक्षात घेता आपला कोणाही सहका-याला त्रास होवू नये म्हणून कळंबोलीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सतिश गायकवाड यांनी आज कळंबोली पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश गायकवाड यांनी कळंबोली पोलीस ठाणेतील अधिकारी व कर्मचारी यांचे आरोग्याचे दृष्टीने कळंबोली पोलीस ठाणे आवारात प्राथमिक आरोग्य केंद्र, कळंबोली मोबाईल टीमच्या सहकार्याने कोविड 19 च्या अनुशंघाने अँटीजेन टेस्ट चे आयोजन करण्यात आले होते.

कळंबोली पोलीस ठाणेकडील 8 अधिकारी व 68 कर्मचारी यांची अँटीजेन टेस्ट करण्यात आली. मात्र मा. पोलीस आयुक्त सो, नवी मुंबई, मा. सह पोलीस आयुक्त, नवी मुंबई, मा. पो. उप. आयुक्त, परि 2, नवी मुंबई यांनी वेळोवेळी दिलेली औषधे, काढा, safty कीट व मार्गदर्शनामुळे पोलीस अधिकारी/ कर्मचारी यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत झाली.
त्यामुळेच सर्व अधिकारी व कर्मचारी यांची अँटीजेन टेस्ट रिपोर्ट नेगेटिव्ह आले. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून कोरोना बाधित पोलीस अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबीयांचे उपचाराकरिता निवारा, सावली केअर सेंटर तसेच डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल उपलब्ध करून दिल्या बद्दल सर्व पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून आभार व्यक्त केले जात आहेत.








Be First to Comment