सिटी बेल लाइव्ह / खालापूर (मनोज कळमकर) 🔶🔷🔷🔶
तालुक्यातील लोधिवली ग्रामपंचायतीमधील भ्रष्टाचार उघङकिस आणूण वर्ष उलटले तरी कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त होत असून पंचायत समिती वरिष्ठ अधिकारी भ्रष्टाचा-यांना पाठिशी घालत आहेत अशी शंका उपस्थित होत आहे.
तालुक्यातील लोधिवली ग्रामपंचायत वादग्रस्त ठरली असून तक्रारिचा पाऊस पङला तरि अधिकारी माञ कोरङेच आहेत.लोधीवली ग्रामपंचायतीत विकासकामे करताना निधीचा भ्रष्टाचार झाला असून कारवाई होत नसल्याने मारुती तवले यानी खालापूर पंचायत समितीच्या प्रवेशव्दारावर 12मार्चला आमरण उपोषण केले होते.
याशिवाय दोन महिन्यापूर्वी तीन वर्षात पंधरा टक्के निधीचा वापर आदिवासी समाजासाठी न झाल्याने संतप्त आदिवासीनी लोधिवली ग्रामपंचायतीला टाळे ठोकले होते. विकासकामे करताना एलईङी दिवे,पेव्हर ब्लाॅक अशा विकास कामात भ्रष्ट्राचार झाल्याचा आरोप ग्रामस्थ मारुती तवले यानी करत चौकशी साठी 18 नोव्हेंबर 2019 रोजी विभागीय आयुक्त ते गट विकास अधिकारी खालापूर यांच्याकडे तक्रार अर्ज देऊन चौकशीची मागणी केली होती.
एकतीस लाख रुपयांची एलएडी दिवे खरेदी प्रकरण भ्रष्टाचार झाला असून ग्रामपंचायत हद्दीतील विद्युत खांब व प्रत्येक घरी एलएडी दिली असती तरी एवढा खर्च झाला नसता असे मारुती तवले यांचे म्हणणे होते. घंटा गाडी दुरुस्ती,ग्रामपंचायत कार्यालय,सदस्यांनी आपल्या घरासमोर व परिसरात पेवरब्लॉक बसविणे,कर्मचारी यांच्या नावे धनादेश काढणे,एवढी उलाढाल असलेली ग्रामपंचायत स्वतःची इमारत असताना भाड्याच्या ठिकाणी ठेवणे असे अनेक आरोप ग्रामपंचायतीच्या कारभार वर तवले यानी केले.
मात्र त्यावर कारवाई होत नसल्याने अखेरिस त्यांनी उपोषणाचा निर्णय घेतला होता.तेव्हा त्याना कारवाई करू सांगत उपोषण मागे घेण्यास पंचायत समिती अधिका-यानी सांगितले होते.परंतु सात महिन्यापासून लोधीवली ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणात कारवाईच झालेली नाही. त्यामुळे भ्रष्टाचाराला मोकाट कुरण भेटले असून उपोषणकर्त्यांची चेष्टा चालवल्याची भावना व्यक्त होत आहे.
पंचायत समितीत चौकशी केल्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रायगङ यांचेकङे अहवाल पाठवला असे उत्तर मिळते.त्यामुळे टोलवाटोलवी सुरू आहे.
मारूती तवले- सामाजिक कार्यकर्ते लोधीवली.
दरवर्षी लेखा ऑङिटला सर्व माहिती मिळते .परंतु अधिकारी ङोळ्यावर पट्टी बांधून सह्या करतात का ? अशी शंका येते.
सुरेश गावङे
-माहिती अधिकार कार्यकर्ता, चौक








Be First to Comment