Press "Enter" to skip to content

पेणचे मैदान आणि गार्डन नागरिकांसाठी खुले करावे : ॲड. वैशाली पाटील

सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे) 🔷🔶🔶🔷

कोरोनाच्या महामारीमुळे संपुर्ण जग लाॅकडाऊन मध्ये होता मात्र हळूहळू आता हे लाॅकडाऊन उघडत असल्याने मागिल सात महिने बंद असलेले पेणचे क्रिकेट मैदान व गार्डन नागरिकांसाठी खुली करावीत या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ता ॲड.वैशाली पाटील, वर्षा गुढदे, रुची महलकर यांनी पेणच्या मुख्याधिकारी अर्चना दिवे यांना देण्यात आले आहे.

पेण मधील अनेक जेष्ठ नागरिक, वृद्ध महिला कोविड मधून रुग्ण बरे झाले असल्याने त्यांना नैसर्गिकरीत्या मोकळा श्वास घेता यावा तसेच सकाळच्या प्रहरी हवेमधून आॅक्सिजनची मात्रा वाढवीता यावी नागरीकांना शारीरिक व्यायाम , योगा करता यावा अशी मागणी करण्यात आली आहे पेण शहरात मोजकीच उद्याने, मैदान आहेत त्यामुळे नगरपालिकेने शासनाच्या नियमांना धरून तसेच योग्य ती बंधने घालून नागरिकांसाठी खुली करावीत जेणेकरुन या कोविडच्या दडपणात नागरीक राहणार नाहीत.

पेण शहरातील कोरोना प्रादुर्भावाचा अंदाज घेऊन येत्या काही दिवसांत मैदान, गार्डन, व्यायामशाळा सुरु करणार.

अर्चना दिवे ---- मुख्याधिकारी पेण नगरपरिषद

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.