सिटी बेल लाइव्ह / उरण / विठ्ठल ममताबादे 🔷🔶🔶🔷
उरण मधील कोरोना चा वाढता प्रादुर्भाव पाहता सध्या रुग्णांना बेड मिळणे कठीण झाले आहे ऑक्सिजन अभावी रुग्णाचे मृत्यू होत आहेत. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे अध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या वाढदिवसानिमित्त उरण विधानसभा युवक काँग्रेस कमिटी तर्फे उरण विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष रोहित श्रीकांत घरत यांनी आमन पॉलीक्लिनिक उरण येथे ऑक्सिजन सिलिंडर किट भेट दिले.
ह्यावेळी उरण विधानसभा युवक उपाध्यक्ष लंकेश ठाकूर, जिल्हा सरचिटणीस जितेश म्हात्रे, सरचिटणीस हितेण घरत, शहराध्यक्ष अब्दुल सिलोत्री, मौलाना अबरार सीलोत्री, नूर सोंडे, असिफ खोत उपस्थित होते.








Be First to Comment