Press "Enter" to skip to content

कळंबोली करांना स्वच्छ पाणी देण्यासाठी सतीश पाटील आक्रमक

पिण्याच्या स्वच्छ पाण्यासाठी नगरसेवक सतीश पाटील करणार आत्मक्लेश 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाईव्ह/ कळंबोली 🔶🔶🔷🔷

कळंबोली येथील सेक्टर 5 ई आणि सेक्टर 6 येथील नागरिकांना मल मिश्रित पाणी पुरवठा होत असल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.वास्तविक हा प्रश्न गेले पाच ते सहा वर्षांपासून प्रलंबित असल्याचे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.तक्रार केल्यानंतर सिडको तात्पुरती उपाय योजना करते मात्र काही दिवसात पुन्हा हाच त्रास सुरू होतो.

या प्रश्नावर कायम स्वरुपी तोडगा काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस चे पनवेल महापालिका जिल्हा अध्यक्ष तथा नगरसेवक सतीश पाटील यांनी कंबर कसली आहे.

याबाबत अधिक माहिती देताना ते म्हणाले की,मी याआधी देखील या प्रश्नावर पाठपुरावा केला आहे.सिडको चे एकसिक्युटिव इंजिनिअर दलाल यांना याठिकाणी पाचारण केले होते.परंतु पुन्हा पुन्हा मलयुक्त पाणी येत असल्याने नागरिकांच्या आरोग्याला ते अत्यंत घातक आहे. covid ची महामारी हैदोस घालत असल्याने असल्या परिस्थितीत स्वच्छ पाणी देणे ही सिडको ची जबाबदारी आहे.मी काही दिवसातच सिडको चे व्यवस्थापकीय संचालक यांची भेट घेऊन कायम स्वरुपी तोडगा काढण्याची विनंती करणार आहे.आदरणीय शरद पवार साहेबांच्या विचारांचा मी पाईक असल्याने त्यांचे अनुसरण करत त्या दिवशी मी निर्जली उपवास करणार आहे.

पाटील पुढे म्हणाले की,पावसाळ्यात पाण्यातून पसरणारे रोग देखील डोकं वर काढत असतात.अशा वेळेस आमच्या जनतेला अनेक पातळ्यांवर संघर्ष करावा लागत आहे.परंतु मी मात्र हा विषय प्राथमिकतेने पटलावर घेऊन त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी झटणार आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.