सिटी बेल लाइव्ह / उरण (घनःश्याम कडू) ः 🔶🔷🔷🔶
कोरोनाच्या महामारीमुळे रेस्टॉरंट व बारमध्ये फक्त पार्सल देण्याचे आदेश असतानाही व कारवाई होऊनही उरणमध्ये मध्यरात्री पर्यंत बारमध्ये बसून दारू पिण्यास दिले जात आहे. याकडे उरणमधील उत्पादन शुल्कचे अधिकारी वर्ग आर्थिक हितसबंधामुळे दुर्लक्ष करीत असल्याची चर्चा नाक्यांक्यावर सुरू आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे शासनाने गर्दीचे व्यवसाय व मंदिरे बंद ठेवली आहेत. आता काहींना सवलत देऊन उघडण्याची मुभा दिली आहे. त्यामध्ये मद्यविक्रीचा समावेश आहे. परंतु ही सवलत फक्त पार्सल देण्यापूर्ती मर्यादीत आहे. परंतु उरणमध्ये याचे सरळ सरळ उल्लंघन होऊन बारमध्ये मध्यरात्री पर्यंत बसून पिण्यास परवानगी दिली जात आहे.
उरण शहरातील सह्याद्री रेस्टॉरंट व बारमध्ये यापूर्वी कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तरीही सदर बारमध्ये शासनाच्या नियमांचे उल्लंघन केले जात आहे. याबाबत उत्पादन शुल्कचे उरणमध्ये असलेल्या कार्यालयातील अधिकारी वर्गाकडे याची तक्रार करूनही ते उलट असे नसल्याचा दावा करीत आहेत. अधिकारी वर्गाच्या सांगण्या प्रमाणे नसेल तर उत्पादन शुल्कच्या वरिष्ठ अधिकार्यांनी अचानक धाड टाकली तर नक्कीच सर्व पितळ उघड होऊन बनावट दारूचा साठाही मोठ्या प्रमाणात मिळेल अशी चर्चा वाईन शॉप व बारच्या आजूबाजूच्या नागरिकांत सुरू आहे.








Be First to Comment