घोषवाक्य स्पर्धेत देवीदास म्हात्रे यांचे घोषवाक्य सर्वोत्कृष्ट 🔷🔶🔶🔷
सिटी बेल लाइव्ह / उरण (बातमीदार) :🔷🔷🔶🔶
वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने घोषवाक्य स्पर्धा आयोजीत केल्या होत्या. या घोषवाक्य स्पर्धेचा निकाल अधिक मासातील एकादशी निमित्त वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे कार्यवाहक मच्छिंद्र म्हात्रे यांनी घोषीत केला. त्या मध्ये सर्वात देवीदास म्हात्रे यांचा घोषवाक्य सर्वोत्कृष्ट ठरला तर अदित्य गावंड यांचा घोषवाक्य लक्षवेधी ठरला.
सदर स्पर्धेत कु.निर्मित पाटील याने प्रथम, कु.भूषण ठाकूर याने व्दितीय, तर कु. हर्षाली पाटील हिने तृतीय क्रमांक मिळविला.तर कु.स्वरा म्हात्रे, कु. शौर्या पाटील, कु.अदिती गावंड उत्तेजनार्थ पुरस्कार देण्यात आले.सर्व विजेत्यांना सोशल डिस्टंसचे नियम पालून मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. तर सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र व भेट वस्तू देण्यात आली.

या बक्षीस वितरणासाठी माजी पंचायत समिती सदस्य लवेश म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य गणपत ठाकूर, वशेणी गाव अध्यक्ष पुरुषोत्तम पाटील,हनुमान सप्ताह मंडळाचे सचिव जे डी म्हात्रे, नरेश पाटील, तशेच मंडळाचे सदस्य विश्वास पाटील,अनंता तांडेल, गणेश खोत आदि मान्यवर उपस्थित होते.या घोषवाक्यांचे अंतर्गत परिक्षण विश्वास पाटील, किशोर म्हात्रे, मच्छिंद्र म्हात्रे व बाह्य परिक्षण अनंत सदाशिव पाटील (पुनाडे) , रमेश अर्जून पाटील (केळवणे) विश्वनाथ रामभाऊ पाटील (उरण) यांनी केले.








Be First to Comment