सिटी बेल लाइव्ह / रोहा/समिर बामुगडे 🔶🔷🔷🔶
श्री. विजयपाल संपत खरात हे 1984 पासून वेलमन टेक्स्टाईल धाटाव तालुका रोहा या कंपनीत कामाला होते, सदर कंपनी डिसेंबर 1997 झाली बंद झाली, त्यानंतर 1998 साली त्यांना प्रायव्हेट फंड कमिशनर साहेब कामगार भविष्य निर्वाह निधी रीजनल ऑफिस ठाणे कार्यालयातून प्राव्हिडेंट फंड मधून त्यांचे जमा असलेले पैसे त्यांना मिळाले.
त्यानंतर ते कोणत्याही कंपनीत कामाला गेले नाहीत. ते मिळेल त्या गाडीवर बदली ड्रायव्हर अशी मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत.वेलमन टेक्स्टाईल कंपनी धाटाव तालुका रोहा या कंपनीतील त्यांचे सोबत असणारे सहकारी कामगार यांना वयोमानानुसार पेन्शन सुरू झाली.
त्यांचेसुद्धा वय 53 चालू असल्याने त्यांना वेलमन टेक्स्टाईल धाटाव तालुका रोहा या कंपनीची पेन्शन चालू होण्यासाठी प्रायव्हेट फंड कमिशनर सो, कामगार भविष्य निर्वाह निधी रीजनल ऑफिस ठाणे यांना योग्य ती कागदपत्र सन 2018साली दाखल केली होती, परंतु त्यांनी त्यांचा फॉर्म कोणत्या ना कोणत्या कारणास्तव फॉर्ममध्ये उणिवा दाखवून फॉर्म पुन्हा पुन्हा भरायला सांगितले.
त्यांनी प्रत्येक वेळी वेगवेगळे फॉर्म भरून दिले आहेत. ते सन 2018 सालापासून माननीय प्राव्हिडेंट फंड कमिशनर साहेब कामगार भविष्य निर्वाह निधी रीजनल ऑफिस ठाणे येथे आज पर्यंत फेऱ्या मारत आहेत .तरीसुद्धा त्यांचे पेन्शनचे काम कोणीही करून देत नाहीत त्यांना नेहमी तुमच्या फॉर्ममध्ये खासदार, आमदार यांच्या सह्या घेऊन या असे सांगून त्यांना फेऱ्या मारायला लावत आहेत. ते मिळेल त्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करीत आहेत परंतु मागील काही महिन्यापासून भारतात कोरोनाव्हायरस चा वाढता प्रादुर्भाव पाहता भारत 22 मार्चपासून लाॕक डाऊन असल्याने त्यांना कोणत्याही प्रकारचे काम मिळत नाही, त्यामुळे त्यांचेवर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यांना पेन्शन चालू झाल्यास त्यांच्या कुटुंबाचा चरितार्थ भगु शकतो परंतु असे होत असल्यामुळे त्यांनी दिनांक 2 ऑक्टोबर 2020 रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे जयंती दिवशी आत्मदहन करून त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी माननिय प्राव्हिडेंट फंड कमिशनर कामगार भविष्य निर्वाह निधी रीजनल ऑफिस ठाणे यांचे समोर आत्मदहन करणार असल्याचे सूचित केले आहे.







Be First to Comment