Press "Enter" to skip to content

कारभार सुधारा अन्यथा… वाचा खासदार सुनील तटकरेंनी कोणाला भरला दम !

बीएसएनएल व पोस्ट खात्याच्या अधिकारी वर्गांनी एकत्र काम करून सात दिवसाच्या आत कारभार सुरळीत करा : खासदार सुनील तटकरे यांचे अधिकारी वर्गाला इशारा 🔶🔷🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / रायगड : अमूलकुमार जैन 🔷🔷🔶🔶

मुरुड हे पर्यटन स्थळ असून येथे देश- विदेशातील नागरिक येत असतात.या ठिकाणी बीएसएनएल ची नेट सेवा २४ तास सुरु राहिली पाहिजे दिवसेंदिवस बीएसएनएल ची सेवा डळमळीत झाल्याने याचा त्रास संपूर्ण रायगड जिल्ह्यास सहन करावा लागत आहे.आपण कारभार सुधारा अन्यथा मला दिल्लीत आपली तक्रार करावी लागेल.पोस्ट कार्यालयातील अधिकारी व बीएसएनएल चे अधिकारी यांनी संयुक्तिक एकत्र काम करून मुरुड तालुक्याचा कारभार सात दिवसाच्या आत सुधारा जोपर्यंत येथील दोन्ही सेवा सक्षम होत नाही तोपर्यंत कोणीही मुरुड सोडून जाऊ नये असे स्पष्ट आदेश रायगड चे खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहेत.

काही दिवसापूर्वी बीएसएनएल ची नर्त सेवा बंद असल्याने पोस्ट खात्यातील कारभार ठप्प झाल्याच्या बातम्या वर्तमान पत्रात प्रसिद्ध झाल्या होत्या त्याची दखल सजग खासदार सुनील तटकरे यांनी घेऊन वरिष्ठ अधिकारी वर्गाची सभा घेऊन वरील निर्देश दिले आहेत.

मुरुड तहसील कार्यालयात संपन्न झालेल्या सभेत तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर,अतिक खतीब,सभापती अशिका ठाकूर,नगराध्यक्षा स्नेहा पाटील, पोस्ट खात्याचे जिल्हा अधीक्षक उमेश जनावडे,बीएसएनएल चे जनरल मॅनेजर डी.के.शर्मा, सहाय्य्क जनरल मॅनेजर सचिन पोहाडकर ,मुरुड सब पोस्ट मास्टर फैयाज पंचुळकर,तहसीलदार गमन गावित,मुख्याधिकारी अमित पंडित आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मुरुड बीएसएनएल कार्यालयातील रुपेश पाटील हे ग्राहकांना नीट उत्तर न देणे सेवा अविरत सुरु राहण्यासाठी कोणतेही प्रयत्न न करणे अश्या अनेक तक्रारी खासदार यांच्या समोर मांडण्यात आल्या यावेळी खासदार तटकरे यांनी जनरल मॅनेजर डी.के.शर्मा,याना त्यांच्यावर कार्यवाही करण्याचे आदेश दिले.

यावेळी बीएसएनएल च्या अधिकारी वर्गांनी स्टाफ कमी असल्याचे व मुंबई -गोवा रस्त्याच्या नवीन कामामुळे वायरी तुटल्याने सदरची सेवा विस्कळीत होत असल्याचे स्पष्टीकरण दिले.यावर खासदार सुनील तटकरे यांनी मला कारणे देऊ नका सात दिवसात ही समस्या निराकरण झालीच पाहिजे.

पोस्ट खात्याचे जिल्हा अधीक्षक उमेश जनावडे यांनी सांगितले की, लवकरच आम्ही एनएस पी २ चा वापर मुरुड पोस्ट कार्यालयासाठी करणार आहोत.त्याच प्रमाणे एएफजी डोंगर ची सुविधा सुद्धा पुरवणार असल्याचे यावेळी सांगितले.

खासदार सुनील तटकरे यांनी दोन्ही खात्यांनी आपापसात चर्चा करून सदरची सेवा अखंडित सुरु राहण्यासाठी प्रयत्न करावेत भविष्यात कोणतीही यंत्रणा बंद पडणार नाही याकडे विशेष लक्ष देणे.ग्राहकांना तातडीने ऑप्टिकल फायबर ची सेवा जलद गतीने मिळण्यासाठी बीएसएनएल ने आपले काम जलद गतीने पूर्ण करावेत असे आदेश यावेळी खासदार यांनी दिले.

यावेळी पदमदुर्ग व्यवसाय संघटनेचे अध्यक्ष अरविंद गायकर यांनी निसर्ग चक्री वादळात नुकसान ग्रस्त टपरी धारकांना मदत करण्याची विनंती केली.खासदार सुनील तटकरे यांनी सांगितले कि आपणास भरपाई मिळावी यासाठी मी जिल्हाधिकारी व सचिव यांच्याशी बोलून घेतो व आपले काम प्राधान्याने पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.

मुरुड समुद्र किनाऱ्यावरील समुद्राच्या भरतीचे पाणी सुरुंच्या झाडामध्ये शिरकाव केल्याने सर्व झाडे उन्मळून पडत आहेत त्यामुळे समुद्राचे सौदर्य नष्ठ होत सडल्याची बाब स्थानिक पत्रकारांनी खासदार यांच्या निदर्शनास आणून देताच त्यांनी त्वरित पालकमंत्री यांच्या दालनात पतन विभागाचे कार्यकारी अभियंता व याबाबतच्या सर्व अधिकारी वर्गाची सभा लावण्याचे आदेश दिले आहेत.त्याच प्रमाणे वाढीव वीज बिलाच्या तक्रारी निवारण करण्यासाठी अधीक्षक अभियंता याना मुरुड येथे पाचारण करून सर्व समस्या सोडवण्याचे यावेळी त्यांनी आश्वासित केले.

याप्रसंगी सर्व अधिकारी व पक्षीय कार्यकर्ते उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.