कोटयावधी खर्च करूनही रस्त्याची अवस्था गंभीर : धुळीच्या साम्राज्यात वाहन चालकांना काही सुचेना 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम)🔶🔶🔷🔷
मुंबई गोवा महामार्गाला जोडला गेलेला रोहा कोलाड मार्ग कोलाड आंबेवाड़ी येथुन जोडलेला खड्यांचा रस्ता असा लौकिक मिळविलेल्या रोहा-कोलाड मार्गावर लहान मोठे खड्डे पडल्याने रस्त्याची अक्षरशः चाळण होऊन दुर्दशा झाली आहे.या रस्त्यावर कोटयावधि रुपये खर्ची होऊनही रस्त्याची अवस्था मात्र’जैसे थे’च आहे.
रस्त्यावर खड्यानी अक्षरशः दहशत पसरवली असून खड़ी व मातीने भरलेले खड्डे आता पुन्हा डोके वर काढू लागले आहेत.प्रचंड खड्यांनंतर आता धूळीने थैमान घातल्यामुळे वाहनचालकांसह प्रवाशांना काही सुचेना धुळीमुळे रहदरिचा प्रश्न मात्र चांगलाच ऐरणीवर आला आहे. त्यातच साईडपट्याही गायब झाल्यामुळे अपघातांच्या प्रमाणात प्रचंड वाढ होत असल्यामुले येथील नागरिक कमालिचा संताप व्यक्त करीत आहेत.
अवघ्या ११ किलोमिटर अंतराच्या रोहा-कोलाड रस्त्यावरुन रात्रंदिवस मोठ्या प्रमाणात रहदारी सुरु असते.जड अवजड वाहनांच्या वर्दळीमुळे रस्ता मात्र जागोजागी अक्षरशः फुटला असून मोठं मोठे खड्यांचे समराज्य पसरले आहे गेली तीन महिने सा बा खात्याचे ठेकेदार हे खड्डे बुजवत आहेत मात्र खड्डे काही बुजता बुजत नसल्याने मागील दोन तीन दिवसांपूर्वी खडी मिश्रीत मातीने हे खड्डे बुजवले गेल्यानंतर आता चक्क त्याची धूळ प्रवासी नागरिकांच्या घसा तोंडात जात असून डोळे फोडी होत आहे तर खड्डी रस्त्याभर पसरली असून दुचाकी वाहने चालवणे अवघड झाल्याचे सर्वत्र बोलले जात आहे खड्यांतुन पसरलेल्या खडीच्या कारणांमुळे दिवसागनिक अपघात होत आहेत.
चाळण झालेल्या या रस्तावरुन नागमोडि वळण घेत संथ गतिने वाहतूक होत असल्यामुळे अनेकांना कंबरदुखी तर काहीना अंगदुखिचे आजार जड़ले आहेत.तर दुचाकी,चारचाकी वाहनांसह सायकलचेही मोठे नुकसान होत आहे.तर कामावर वेळेत हजर न राहता आल्यामुळे कामगार वर्गाला घरि परतावे लागत आहे.अशामुळे आर्थिक नुसानाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्याच्या डागडुजी कामी सार्वजनिक बांधकाम विभागा मार्फ़त दरवर्षि करोडो रुपये खर्च होऊन पैशाचा अक्षरशः चुराडा होत आहे.रस्त्याच्या मलमपट्टीत उन्हाळी निकृष्ट दर्जाच्या डांबरिने भरलेले खड्डे अवघ्या दोन तीन महिन्यात पुन्हा डोके वर काढत आहेत.तर पावसाळी हेच खड्डे पुन्हा खड़ी व मातीने भरुनही रस्त्याला जणु डबक्याचे रुप आल्याचे पहावयास मिळत असते. दरम्यान, दरवर्षी सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत होत असलेल्या रस्त्याच्या मलमपट्टि व खड्डे भरो मोहिमेत ठेकेदार मात्र चांगलेच गब्बर झाले असल्याचे बोलले जात असून प्रवाशांचा मात्र जणू खेळच मांडला असल्याची चर्चेला मात्र उधाण आले आहे.
रोहा कोलाड रस्त्यावर पाऊस पडताना चिखलमय खड्यांचा तर पावसाने उघडिप घेतल्यानंतर धुलीचा त्रास मात्र वाहनचालकांसह,दुचाकीस्वरांच्या नशिबि आहे.रस्त्यावरुन सतराशे साठ खड्यातुन मार्ग काढताना वाहनचाकाना मोठी कसरत करावी लागत आहे.तर खड्डे चुकवीताना वारंवार अपघात होत आहेत.खड्यांच्या या रस्त्यावर जीव मुठित घेऊन जात असताना एखादी व्यक्ति दगावल्यास याला जबाबदार कोण?असाही प्रश्न समोर येत आहे.
कोलाड रोहा हा मार्ग अवघ्या १५ ते २० मिनीटात मार्गक्रमण होणाऱ्या रस्त्यावर आता पाउन तास लागत असल्याने वेळही वाया जात आहे.तर लांब पल्याच्या गाड्या याच रस्तावरुन जात असल्याने गाड्यांचीही खिळखिळी अवस्था झाल्याचे पहावयास मिळत आहे. या रस्त्याचे नव्याने काम होणे गरजेचे आहे.मात्र जणु कानात बोळे घालून बसलेल्या सार्वजनिक बांधकाम खात्याने रोहा कोलाड रस्त्यावर प्रवाशांचा “खेळ मांडला” का ? असा प्रश्न मात्र आता वाहनचालकांना पडला असल्याचे समोर आल्याचे चित्र निर्माण झाले आहे .








Be First to Comment