सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे) 🔶🔶🔷🔷
पेणच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती पदासाठी झालेल्या निवडणुकीत एकच अर्ज दाखल झाल्याने सभापती पदी भाऊ खंडू एरणकर यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा निबंधक डी.आर.माळवे यांनी जाहीर केले.तर उपसभापती म्हणून रामदास घासे यांची निवड करण्यात आली.
यावेळी माजी आ.धैर्यशील पाटील, जि.प.चे माजी सभापती प्रमोद पाटील, शेकापचे चिटणीस संजय डंगर, सुरेश पाटील, प्रफुल्ल पाटील, पेण पंचायत समिती सभापती सरिता पाटील, पांडुरंग पाटणे, दिनेश खैरे, मधुकर पाटील, नगरसेवक शोमर पेणकर, संतोष पाटील आदिंसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलतांना नवनिर्वाचित सभापती भाऊ खंडू एरणकर यांनी सांगितले की कै. भाई मोहन पाटील यांच्या पुण्याईमुळे मला शेकाप पक्षाचे सोळा वर्ष सरपंचपद पाच वर्ष पंचायत समिती सदस्य व सभापतिपद तसेच आता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती हे पद मिळाले आहे तेव्हा येणाऱ्या काळात शेतक-यांच्या हितासाठी कामे करण्यात येतील शेकापक्ष हा नेहमीच शेतकरी कामगार कष्टकरी श्रमजीवी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.








Be First to Comment