Press "Enter" to skip to content

कोरोनाने उरणमध्ये आज दोघांचा मृत्यू तर ६ पॉझिटीव्ह

सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔷🔷🔶

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ६ जण सापडले आहेत. २१ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. आज २ जण मयत झाले आहेत.
आज एकूण पॉझिटीव्ह १८४७, उपचार करून बरे झालेले १५६२, उपचार घेणारे १९२, मयत ९३ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज चिरले २, पाणजे १, श्रीयोग करंजा १, वशेणी १, दिघोडे १ असे एकूण ६ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. वैभव लक्ष्मी अपार्टमेंट १, नेव्हल स्टेशन करंजा १, बोकडविरा २, कवी कमल निवास १, विंधणे १, कोळीवाडा १, ओमसाई अव्हेन्यू सोसायटी १, एमएसईबी बोकडविरा १, जसखार १, चाणजे सब सेंटर करंजा १, जीटीपीआयएस कॉलनी बोकडविरा १, मूळपाडा चिरनेर १, मुळेखंड १, चिरले १, मोठीजुई १, पागोटे १, नागाव १, रांजणपाडा १, गणेश नगर करंजा रोड १, गोवठणे १ असे एकूण २१ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. तर उरण १ व केगाव येशीदेव मंदिराजवळ १ असे २ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा कमी आला आहे. तर उपचार करून घरी सोडण्यात आलेल्यांचा आकडा जास्त आहे. मात्र २ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने भीतीचे वातावरण आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.