सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम ) 🔷🔷🔶🔶
मुंबई-गोवा या राष्ट्रीय मार्गवर १७ वरील असणारे कोलाड नाका हे मध्यान्ह ठिकाण असुन या नाक्यावर बस थांबा नसल्याने ऊन,वारा,पाऊस स्थानिक नागरीक,प्रवाशांसह,विद्यार्थी,अबालवृध्द,
रुग्ण यांच्यासाठी मोठा आधार असणारा बस थांबा मुंबई-गोवा चोपदरीकरणात तोडण्यात आला.परंतु तो गेल्या दहा वर्षीपासुन न बांधल्यामुळे ऊन-पावसात ताटकळत उभे राहणाऱ्या प्रवासी नागरिकांचे अतोनात हाल होत आहे.
मुंबई-गोवा मार्गावरील पनवेल ते इंदापूर दरम्यानच्या रस्त्याचे काम दहा वर्षापासुन सुरु असुन त्याचे काम पूर्ण होण्यास किती कालावधी लागेल याची खात्री देता येत नाही.परंतु कोलाड नाक्यावरील बस थांबा तोडलेला बस थांबा लवकरच-लवकर बांधण्यात यावे व प्रवासी वर्गाला दिलासा मिळावा अशी मागणी प्रवासी वर्गात जोर धरत आहे.
कोलाड नाका हे ठिकाण मुंबई-गोवा महामार्गावरील मध्यान्ह ठिकाण असुन या नाक्यावर कोलाड,खांब, भिरा, परीसरातील गाव,वाड्या वस्त्या धरून ४० ते ४५ गावातील नागरीक मुंबई,गोवा,अथवा अलीबागकडे जाण्याकरता कोलाड नाक्यावर थांबावे लागते. शिवाय या मार्गावर शाळा,कॉलेज,डिप्लोमा कॉलेज असल्याने असंख्य विद्यार्थी येत असतात.शिवाय येथे रविवारी मोठा बाजार असुन येथे प्रचंड गर्दी असते.
यामुळे बस थांबा नसल्याने प्रवासी विद्यार्थी रस्त्याच्या कडेला उभे असतात या मार्गावर छोट्या-मोठया वाहनासह अवजड वाहनांची सतत वर्दळ सुरु असते.त्यामुळे प्रवाशांच्या जिवाला धोका निर्माण झाला असुन प्रवाशांना रस्त्यावर उभे रहाणे कठीण व धोकादायक झाले आहे.त्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय थांबवुन सुसज्ज व सुंदर बस थांब्यासाठी संबंधित शासन प्रशासन व सामाजिक कार्यकर्ते यांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी प्रवाशांकडून जोर धरत आहे.








Be First to Comment