चाईल्ड केअर सामाजीक संस्था उरणचे मुख्य सचिव अभिषेक माळी यांच्या वाढदिवसानिमित्त उपक्रम 🔶🔶🔷🔷
सिटी बेल लाइव्ह / उरण (सुनील ठाकूर ) 🔷🔶🔶🔷
चाईल्ड केअर सामाजीक संस्था, उरण रायगड संस्थे चे मुख्य सचिव अभिषेक माळी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संस्थेकडून उरण चिरनेर, पासून 2 कि. मी. डोंगराळ भागात माकडडोरा या आदिवासी वाडीत लहान मुलांना खाऊ, शाळेत जाणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य, तसेच आदिवासी वाडीतील लोकांना अन्न, धान्य व मास वाटप करण्यात आले. आदिवासी वाडीतील लोकांनी संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष विकास कडू यांचे पुष्प गुच्छ देऊन आभार मानले.

कार्यक्रमासाठी मनोज पाटील (रायगड, भुषण ),विवेक पाटील (समाजसेवक, पागोटे ),सुभाष कडू (पत्रकार, सकाळ) आणी मनोहर कातकरी (माकडडोरा, सामाजिक कार्यकर्ते ) तसेच संस्थेकडून संस्थेचे संस्थापक – विकास कडू, कार्याध्यक्ष -विक्रांत कडू, मुख्यसचिव -अभिषेक माळी, उपाध्यक्ष -ह्रितिक पाटील, सदस्य -उद्धव कोळी आणी सभासद, माकड डोरा वाडीतील अनेक लोक उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी मनोज पाटील आणी विवेक पाटील यांना चाईल्ड केअर सामाजिक संस्था चे संस्थापक -अध्यक्ष, विकास कडू यांच्या हस्थे कोविड 19 योद्धा प्रमाण पत्र देऊन सम्मान करण्यात आले.
हा कार्यक्रम झाल्यावर आदिवासी वाडीतील लोकांनी चाईल्ड केअर सामाजिक संस्थेचे आभार मानले कार्यक्रमाचे प्रस्थावना संस्थेचे अध्यक्ष विकास कडू यांनी माडली आणी आभार प्रदर्शन संस्थेचे कार्याध्यक्ष विक्रांत कडू यांनी केले.








Be First to Comment