रास्तभाव धान्य दुकान वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष व पनवेल तालुका शिवसेना संघटक भरत पाटील यांच्या मागणीला यश ! 🔶🔶🔷🔷
सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी 🔷🔶🔶🔷
रास्त भाव धान्य दुकान व केरोसीन परवाने मंजूर करण्यात येवून नवीन दुकानांसाठी जाहिरनामा प्रसिध्द करण्यात यावा अशी मागणी रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष व पनवेल तालुका शिवसेना संघटक भरत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती त्यांच्या मागणीला यश येवून गावांची नावे जाहीर करण्यात येवून जाहिरनामे काढण्यात आले आहेत.
नवीन दुकानांसाठी जाहिरनामा प्रसिध्द करण्यांचे शासकीय स्तरावरून आदेश पारित करण्यांत आलेले होते व आहेत सन २०१ ९-२० मध्ये सार्वत्रिक निवडणूकांच्या अनुषंगाने आचारसंहितेचा भंग होवू नये म्हणून शासन निर्णय दि .०१ / ०८ / २०१७ , मध्ये दिलेल्या वेळा पत्रकानुसार रास्त भाव धान्य दुकान व केरोसीन परवाने मंजूर करण्यांची कार्यवाही होवू शकली नाही त्यामुळे पनवेल तालुक्यातील अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत , सार्वत्रिक निवडणूकांच्या अनुषंगाने आचारसंहिता काळात व काही दुकानदारांनी पूर्वी राजीनामे दिल्यामुळे सदरची दुकाने तात्पुरत्या स्वरूपात महिला दुकानदारांना लाभार्थी कार्डधारकांची पर्यायी व्यवस्था म्हणून चालविण्यांस देण्यात आलेली आहेत. ती दुकाने कोरोना सारख्या महामारीत महिला दुकानदार ईमाने इतबारे आपला जीव धोक्यात घालून लाभार्थी कार्डधारकांची सेवा करीत आहेत , त्यांना कोरोनाच्या महामारीत पुकारलेल्या संचारबंदीत कोणीही नागरिक उपाशी राहू नये म्हणून शासन निर्णयाचे काटेकोर पालन करताना दिसून आले. त्यांची तात्पुरती स्वरूपात जोडण्यांत आलेली दुकाने प्राधान्याने पुर्ववत मंजूर करणे आवश्यक व गरजेचे होते
परंतु प्रस्तुतच्या प्रकरणी अदयाप पर्यंत जिल्हा व तालुका पातळीवर निर्णय घेण्यांत आला नव्हता. त्यामुळे तालुक्यातील कोपर, खानाव, विहघर, बोनशेत, वहाळ, कुडावे, बंबाचापाडा, कासप, कासरभट, उसरली बुद्रुक, बोरले, सांगडे, मोहोपे, चिंचवळी तर्फ वाजे, अकुळवाडी, उसरली खुर्द, आरीवली, करंजाडे, नांदगाव, आकुर्ली, नारपोली, चिंचवळी तर्फ तलोजे, आष्टे, नारपोली, पाटनोली, मोहो, दहिवली, चेरिवली, गव्हाण, महाळूंगी, आदई, दुंद्रे, धोदाणी, शिरढोण, सारसई, कोन या गावातील प्रकरणे विनाकारण प्रलंबित होती, ती आता रास्तधान्य दुकान संघटनेचे अध्यक्ष भरत पाटील यांच्या अथक प्रयत्नांनंतर आता त्यांचे जाहिरनामे काढण्यात आले आहेत. त्यांच्या मागणीला यश आले आहे.
त्यांनी वर्षानुवर्षे तसेच कोरोना महामारीत ज्यानी विना तकार सेवा दिलेली आहे , त्यांना परवाना देणे आवश्यक आहे जेणे करून शासनाचा वेळ व खर्च वाचेल , अशीही मागणी रास्त भाव धान्य दुकान व किरकोळ रॉकेल विक्रेता वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष व पनवेल शिवसेना संघटक भरत पाटील यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली होती.








Be First to Comment