Press "Enter" to skip to content

द्रोणागिरी किल्ल्यावर दुर्गमावळा परिवारातर्फे द्रोणागिरी संवर्धन मोहीम


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔷🔶🔶

द्रोणागिरी किल्ल्यावर दुर्गमावळा परिवारातर्फे द्रोणागिरी संवर्धन मोहीम आयोजित करण्यात आली होती. यावेळी अनेक संस्था सहभागी झाल्या होत्या.
पडलेल्या मुसळधार पावसामुळे द्रोणागिरी किल्यावर डोंगरातून जात असलेल्या पायवाटेवर अनेक ठिकाणी झाडे, दगड गोटे तसेच वाट अवघड बनली होती.

त्यामुळे किल्ल्यावर जाणारी वाट किचकट बनली होती. सदर वाट व्यवस्थित करण्यासाठी दुर्गमावळातर्फे द्रोणागिरी संवर्धन मोहीम काल रविवारी आयोजित केली होती. मोहीम सकाळी ९ वाजता सुरू झाली ती सायंकाळ पर्यंत सुरू होती.

या मोहिमेत द्रोणागिरी किल्ल्यावर जाणाऱ्या पायवाटेवर पडलेले दगड काढण्यात आले. तसेच निसरडी झालेल्या वाटेवर पायऱ्या करण्यात आल्या.

या मोहिमेत अनेकजण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. दुर्गमावळा परिवारातर्फे आयोजित करण्यात आलेल्या या द्रोणागिरी संवर्धन मोहिमेत त्यांच्या बरोबर जय शिवराय प्रतिष्ठान ( जीते – पेण ), किल्ले मोहीम ग्रूप ( गोवठणे उरण ) आणि आगरी कोळी करडी सामाजिक संघर्ष संस्था आदी सहभागी होऊन त्या सर्वांच्या सहकार्याने द्रोणागिरी संवर्धन मोहीम यशस्वीपणे संपन्न झाली.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.