Press "Enter" to skip to content

रीलायन्स कंपनी नागोठणे येथे कंत्राटी कामगारांना न्याय मिळून देणार – शिवसेना

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (याकुब सय्यद) 🔶🔷🔷🔶

रीलायन्स कंपनी नागोठणे येथे कंत्राटी कामगारांना न्याय मिळून देण्यासाठी शिवसेना रायगड जिल्हा परिषद सदस्य किशोर भाई जैन व उपजिल्हा प्रमुख तथा पंचायत समिती सदस्य नरेश भाई गांवड पेण विधानसभा संघटिका, श्रीमती दर्शना जवके शिवसेना शाखा प्रमुख दीपक पाटील यांनी रिलायन्स मटेरियल गेट आणि नागोठणे पोलीस स्टेशन येथे कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी भेट दिली तसेच रिलायन्स कंपनी ने दोन दिवसाची अवधी मागितली आहे,सोबत शिवसेना उपतालुकाप्रमुख जयराज तांडेल, माजी उपजिल्हाप्रमुख सु.धा भोय,भाजपचे पदाधिकारी माननीय हिरामण कोकाटे, ग्रामपंचायत सदस्य शिहु गणपत खाडे,सामाजिक कार्यकर्ते योगेश ठाकूर, शिवसेना शाखाप्रमुख शिहु मनोज मोकल,शाखाप्रमुख संदिप ठाकूर,करकरणी आईचे पुजारी दत्तात्रेय कुथे,शाखाप्रमुख झोतीरपाडा मोहन पाटिल, कट्टर शिवसैनिक संजय भोय,संजय कुथे ,मंजुला ताई म्हात्रे,नरेश खाडे उपशाखाप्रमुख,कमलाकर मोकल.
आणी सर्व कामगार उपस्थित होते.

दोन दिवसाचा अवधी कंपनी कडून दिला आहे,दोन दिवसात कंपनीने कामगारांना न्याय देऊन कामावर रुजू करूण घ्यावे नाहीतर शिवसेना किशोरभाई जैन यांच्या नेतृत्वाखाली जन आदोलन करून गेट बंद करेल असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश गावंड आणी स्थानिक समाजसेवक व पदाधिकारी यांनी कंपनी व्यवस्थापनेला दिला आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.