Press "Enter" to skip to content

पोल्ट्री व्यावसायिकांनी घेतली रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांची भेट

पोल्ट्री व्यवसायिकांच्या समस्यांबाबत पशुसंवर्धन मंत्र्यांची बैठक घेऊन न्याय मिळवून देणार — खा. सुनिल तटकरे 🔷🔶🔶🔷

सिटी बेल लाइव्ह / पेण (राजेश कांबळे) 🔷🔷🔶🔶

निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असुन आतापर्यंत योग्य ती नुकसानभरपाई मिळाली नसल्याने अखेर पोल्ट्री व्यावसायिकांनी रायगडचे खासदार सुनिल तटकरे यांची नुकतीच भेट घेऊन आपल्या विविध मागण्यांसंदर्भात निवेदन दिले आहे या निवेदनात त्यांनी अनेक समस्या मांडल्या आहेत.

यामध्ये चक्रीवादळामुळे झालेले नुकसान, पशु खाद्य कंपनीकडून होणारे जास्तीचे दरवाढ, ग्रामपंचायतीचे कर, लाईट मिटर बाबत समस्या, पक्षांचे झालेले नकसान, बॅंकांकडून मिळत नसलेले कर्ज या इतर बाबींमुळे जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिक अडचणीत आले आहेत त्यामुळे शासनाने या व्यवसायिकांचा अंत न पाहता तातडीने नुकसानभरपाई देऊन इतर समस्यांही सोडवाव्यात शासनाने पोल्ट्री व्यावसायिकांना दिलेली नुकसान भरपाई ही तुटपुंजी असून सदर व्यवसायिकांचे कुटुंब उद्ध्वस्त होत आहे कोकणातील शेती व्यवसायाबरोबरच पोल्ट्री व्यावसाय हा फार मोठा आहे त्यामुळे आमच्या मागण्या सोडविण्यात याव्यात याकरीता जिल्ह्यातील पोल्ट्री व्यावसायिकांनी खासदार सुनिल तटकरे यांची भेट घेऊन याबाबतचे निवेदन देण्यात आले.

पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकासमंत्री सुनिल केदार यांच्यासह राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांच्या बरोबर चर्चा करून सदरच्या मागण्या मंत्रीमंडळात मांडल्या जातील आणि त्या लवकरच मंजूर ही होतील असा विश्वास त्यांनी पोल्ट्री व्यावसायिकांना देऊन सरकार शेतकरी यांच्या पाठीशी आहे.
खा.सुनिल तटकरे 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.