Press "Enter" to skip to content

हालीवली ग्रामपंचायतीत शिवसेना विरुद्ध शिवसेना वाद

शिवसेनेच्या सरपंच प्रमिला बोराडे व त्यांचे पती सुरेश बोराडे यांच्यावर केले बिनबुडाचे आरोप 🔷🔷🔶🔶

बदनामी करणाऱ्या बिल्डर व इतरांवर महिला सरपंच ठोकणार मानहानी व अब्रू नुकसानीचा दावा ! 🔶🔷🔷🔶

सिटी बेल लाइव्ह / भिसेगाव – कर्जत /सुभाष सोनावणे 🔶🔷🔶🔷

कर्जत तालुक्यातील शहराच्या लगत असणाऱ्या हालीवली ग्रामपंचायती मध्ये सध्या शिवसेना विरुद्ध शिवसेना असा वाद उफाळून आला आहे . हालीवली ग्रामपंचायतीच्या थेट नागरिकांमधून निवडून गेलेल्या विद्यमान सरपंच सौ . प्रमिला बोराडे व त्यांचे पती शिवसेनेचे विभागप्रमुख सुरेश बोराडे यांच्यावर शिवसेनेचेच उपसरपंच केतन बोराडे हे बिनबुडाचे तसेच पुरावा नसलेले आरोप करत असल्याने प्रसार माध्यमातून पक्षाची तसेच एक महिला सरपंचाची होणारी बदनामी शिवसेनेतील इतर वरिष्ठ पदाधिकारी याकडे करत असलेल्या दुर्लक्षामुळे तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे .

हालीवली ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ . प्रमिला बोराडे या उच्चशिक्षित असून सामाजिक , धार्मिक , राजकीय , शैक्षणिक क्षेत्रात काम करण्याची त्यांना आवड आहे . म्हणूनच थेट महिला सरपंच म्हणून त्या निवडून आल्यावर त्यांनी पारदर्शक , भ्रष्टाचार विरहित काम करून या दीड वर्षात गावात विकासाची गंगा आणून कायापालट केला . त्यांचे कार्य अविरत चालू आहे , तर त्यांचे पती सुरेश बोराडे हे पंचवीस वर्षे बाळासाहेबांच्या विचारांनी घडलेले कट्टर शिवसैनिक आहेत . त्यांचे आजपर्यंतचे कार्य बघूनच त्यांना ग्रामस्थांनी हालीवली तंटा मुक्तीचे अध्यक्ष बनविले आहे .

सरपंच सौ. प्रमिला बोराडे यांच्या पारदर्शक कामाचा त्रास इतरांना होऊ लागल्याने गावाच्या शेजारीच असणाऱ्या सिग्नेचर ग्रुप चे बिल्डर पंकज पटेल यांनी शिवसेनेच्या इतर सदस्यांना हाताशी धरून काहीही पुरावा नसताना बिनबुडाचे आरोप केले आहेत . बिल्डर पंकज पटेल यांना ग्रामपंचायतीने ग्रामसेवकांच्या सहीने तीन वर्षांची घरपट्टी भरण्यास सांगितली असताना ती भरण्यास ते टाळाटाळ करत आहेत व खोटे पत्रक दाखवून दिशाभूल करत आहेत . बिल्डर पंकज पटेल यांनी बांधलेली कंपाऊंडच्या बेकायदेशीर भिंतीमुळे अनेक ग्रामस्थांचा अपघात झाल्याने ग्रामपंचायतीकडे हालीवली ग्रामस्थांनी केलेल्या अर्जामुळेच सरपंच , व अन्य सदस्यांनी वारंवार सांगूनही बिल्डरने केलेल्या दुर्लक्षामुळे अखेर ग्रामस्थांच्या सुरक्षेसाठी ती बेकायदेशीर भिंत ग्रामपंचायतीने तोडण्यात आली होती .

ही भिंत वाचविण्यासाठी सुरेश बोराडे यांनी माझ्याकडे पैसे मागितले असे बिल्डर पंकज पटेल यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे विभागप्रमुख सुरेश बोराडे यांनी ठामपणे सांगितले आहे . तसेच जो नाला आहे तो किरवली ग्रामपंचायत हद्दीत येत असून तो नाला तोडण्याचे काम रेल्वे प्रशासनाचे असल्याने माझा त्या कामाशी काडीचाही संबंध नाही , तरीही उपसरपंच केतन बोराडे हे काहीही बिनबुडाचे आरोप करत आहेत असे सुरेश बोराडे यांनी म्हटले आहे .

पारदर्शक व भ्रष्टाचार विरहित काम करतांना नेहमीच अडचणी येतात त्यांना सामोरे जाताना मी एक महिला सरपंच असतांना माझ्यावर जे बिनबुडाचे व बदनामीकारक आरोप केले आहेत त्या विरोधात बिल्डर पंकज पटेल व इतर समाज कंटक यांच्या विरोधात राज्य महिला आयोग यांच्याकडे दाद मागणार असून त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा कोर्टात दावा ठोकणार असल्याचे हालीवली ग्रामपंचायत थेट सरपंच सौ . प्रमिला बोराडे यांनी सांगितले . तर चाललेला प्रकार निंदनीय असून माझी व पक्षाची शिवसेनेचे इतर सदस्यांनी प्रसार माध्यमातून षडयंत्र करून चालवलेली बदनामी मी आमदार महेंद्रशेट थोरवे तसेच संपर्कप्रमुख दत्ताजी दळवी व शिवसेना पक्षप्रमुख मा . उध्दवसाहेब ठाकरे यांची भेट घेऊन सविस्तर तक्रार करणार असल्याचे विभागप्रमुख सुरेश बोराडे यांनी मत व्यक्त केले .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.