पोयंजे विभागप्रमुखपदी नितिन पाटील 🔶🔷🔷🔶
सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔶🔶🔷🔷
उरण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पनवेल उपतालुकासंघटकपदी सुधीर अनंत पाटील व पोयंजे शिवसेना विभागप्रमुखपदी नितिन संभाजी पाटील यांची नियुक्ती करण्यात आली.
शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी नियुक्ती पत्रक व पुष्पगुच्छ देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी पनवेल तालुकाप्रमुख रघुनाथ पाटील, उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, पनवेल तालुकासंपर्कप्रमुख अनंता पाटील, उपतालुकाप्रमुख विष्णू लहाने तसेच पोयंजे-गुळसुंदे विभागातील, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने सोशल डीस्टंच्या नियमाप्रमाणे उपस्थित होते.








Be First to Comment