सिटी बेल लाइव्ह / प्रतिनिधी ( वेश्वि )🔷🔶🔶🔷
अवघे विश्व हेचि माझे घर ही संकल्पना मनात ठेवून आपण ह्या जगात थोडं काही तरी केले पाहिजे या संकल्पनेनुसार आपल्या सभोवताली अगदी आर्थिक दृष्टीने मागासलेल्या समाजासाठी मदतीचा हाथ हा C O N ही संस्था नेहमी देत असते आणि संस्थेच्या उपक्रमानी सतत हे दाखवून दिल आहे.
मग लॉकडाउन काळात मोफत अन्न धान्य वाटप असेल , किवा मोफत मास्क व सैनीटाइजर वाटप, असेल किवा मोफत शैक्षणिक साहित्य मदत असेल याना त्या माध्यमातून C O N ही संस्था सतत अग्रेसर असते. या संस्थेच्या तर्फे राणसई येथील खैरकाठी आदिवासी वाडिवर आदिवासी मुलाना मोफत सायकल चे वाटप करण्यात आले.

संस्थेचा उद्देश एकमेव की गरीब मुलाना आर्थिक दृष्टया सायकल घेणे परवडत नाही आणि त्या अभावी शारीरिक करसरत होत नाही आणि बाजार पेठ खुप दूर असल्याने अगदी पायी चालत येणे अवघड होते हे सर्व लक्षात घेऊन सामाजिकतेची जाणीव ठेवत 18 दुचाकी सायकल चे वाटप करण्यात आले सायकल हातात मिलताच आदिवशी मुलांच्या चेहऱ्यावर जो आनंद पाहायला मिलाल या प्रसंगी C O N संस्थेचे संथापक राजू मुंबईकर, सारडे विकास मंच चे अध्यक्ष नागेंद्र म्हात्रे, अनिल घरत, संपेश पाटील, रोशन पाटील, समाधान पाटील हे मान्यवर उपस्थित होते.








Be First to Comment