Press "Enter" to skip to content

पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजप कळंबोली तर्फे १६८ चष्मे वाटप

सिटी बेल लाइव्ह / कळंबोली / प्रतिनिधी 🔷🔶🔶🔷

जगातील लोकप्रिय नेते गोरगरीब, वंचित, दलित, आदिवासी आणि शेतकर्‍यांसाठी देवदूताप्रमाणे काम करणारे देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांचा १७ सप्टेंबर २०२० रोजी जन्म दिवस होता . या निमित्ताने लोकनेते रामशेठ ठाकूर व उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली  रायगड जिल्ह्यात सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.  यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.  भाजप कळंबोली मंडला तफे सेवा सप्ताह अंतर्गत आज ( २७ ) एकुण १६८ चष्माचे वाटप करण्यात आले

भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दरवर्षी सेवा सप्ताहाच्या दरम्यान विविध प्रकारचे सेवा कार्य करून पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांना दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी प्रार्थना करतात. यावर्षी मा. मोदी साहेब यांचा ७० वा वाढदिवस असल्याने पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. जगतप्रकाशजी नड्डा यांच्या सुचनेनूसार संपूर्ण देशभर सेवा सप्ताहाचे आणि विविध सेवा कार्याचे आयोजन केले जात आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजप कळंबोली मंडळाच्या वतीने  १६८  गरीबांना त्यांच्या आवश्यकते नूसार चष्म्याचे वाटप,  .गरीब वस्तीत आणि रुग्णालयात फळांचे वाटप,  रक्तदान शिबिराचे आयोजन,  विविध जातीच्या वृक्षाची लागवड करणे,  कान तपसणी करून मशिनचे वाटप करण्यात आले  गावात स्वच्छता अभियान राबवून प्लास्टीक मुक्तीचा संकल्प करणे यासह विविध कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले येत आहे.

मोफत चेष्मा वाटप कार्यक्रमाच्या वेळी पनवेल महानगकपालिके माजी स्थायी समिती सभापती नगरसेवक अमर पाटील,  प्रकाश शेलार, कमळ कोठारी, बबन बरागजे, श्रीकांत ठाकूर, महिला नेत्या प्रियंका पवार आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते.  भाजपाचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पक्ष पदाधिकारी, लोकप्रतिनीधी आणि कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने लोकउपयोगी आणि समाज उपयोगी कार्यक्रमाचे नियोजन करून यशस्वी करावे असे आवाहन केले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.