सिटी बेल लाइव्ह / खांब-रोहे (नंदकुमार मरवडे) 🔷🔶🔶🔷
रोहे तालुक्यातील तळवली तर्फे अष्टमी या ग्रा.पंचायतीच्या वतीने माझे कुटुंब माझी जबाबदारी या आरोग्य अभियानाची सुरूवात करण्यात आली आहे.
येथील सरपंच रूपाली कोस्तेकर यांच्या हस्ते या मोहिमेला सुरुवात करण्यात आली असून यावेळी प्रत्येक घराघरात जाऊन आरोग्य तपासणी, आँक्सीमिटर व टेम्परेजर तपासणी करून कोरोना काळात रहिवासी वर्गाने कशाप्रकारे काळजी घेतली पाहिजे याबाबत माहिती सांगितली. तर या मोहिमेत ग्रा.पंचायत रहिवासी वर्गाने सहभागी घेऊन लाभ घेण्याचे अवाहन सरपंच रुपाली कोस्तेकर यांनी केले आहे. तसेच घरात अन्य कोणताही जरी आजार असेल तरी आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले.
यावेळी उपसरपंच मानसी लोखंडे, मा. उपसरपंच रघुनाथ कोस्तेकर,युवा कार्यकर्ते शशिकांत मरवडे,
तलाठी भोईर ,कृषी खात्याचे कुंभारे,अंगणवाडी सेविका,आशा सेविका व मदतनीस आदी उपस्थित होते.








Be First to Comment