Press "Enter" to skip to content

उरणमध्ये आज कोरोनाचे दोन बळी : चार पॉझिटीव्ह


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔷🔶🔶

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह ४ जण सापडले आहेत. ८ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. आज २ जण मयत झाले आहेत.

आज एकूण पॉझिटीव्ह १८४१, उपचार करून बरे झालेले १५४१, उपचार घेणारे २०९, मयत ९१ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज केगाव १, श्री समर्थ अपार्टमेंट १, पिरकोन २ असे एकूण ४ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. उरण कोळीवाडा १, चिंतामणी सोसायटी उरण २, पाणजे १, साई निकेतन अपार्टमेंट १, सोनारी १, वसुंधरा सोसायटी १, भवरा १ असे ८ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. तर सारडे १ व पिरकोन १ असे २ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

उरणमध्ये आज पॉझिटीव्ह व उपचार करून घरी सोडण्यात आलेल्यांचा आकडा कमी असला तरी २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे उरणमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे, या भ्रमात कोणी राहाता सावध रहाणे गरजेचे आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.