दिवेआगर समुद्रकिनाऱ्याच्या स्वच्छतेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार 🔷🔷
दिवेआगर पर्यटन विकास मंडळाचा स्तुत्य उपक्रम 🔶🔶
सिटी बेल लाइव्ह / रायगड : धम्मशिल सावंत 🔶🔶🔷🔷
२७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यामुळे आजच्या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर समुद्रकिनारी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
दिवेआगर पर्यटन विकास मंडळ व दिवेआगर ग्रामस्थांच्या सहभागातून दिवेआगरच्या समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यात आली.
कोरोनाच्या जैविक महामारीत मागील 7 महिने पर्यटन पूर्णतः बंद आहे. त्यामुळे येथील व्यावसायिकांचा रोजगार बुडाला आहे. तसेच किनाऱ्यावर पर्यटकांची व ग्रामस्थांचीही रेलचेल नाही परंतु असे असले तरीही किनाऱ्यावर अनेक ठिकाणी अस्वच्छता असल्याचे दिसून आले. याचे कारण म्हणजे समुद्राच्या लाटांसोबत प्लास्टिकच्या पिशव्या, कागदाचे तुकडे, टाकाऊ वस्तू असे अनेक घटक किनाऱ्यावर आले आहेत.
त्यामुळे दिवेआगर चा समुद्रकिनारा सदैव स्वच्छ आणि नैसर्गिकदृष्ट्या अबाधित राहावा या सामाजिक बांधिलकीतुन व समुद्रकिनाऱ्याचे जतन व्हावे या जाणिवेतून ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली असल्याचे येथील ग्रामस्थ सांगतात.








Be First to Comment