Press "Enter" to skip to content

डोळ्यादेखत उभी पिके झाली अडवी

उत्तरा नक्षत्र मुळे शेतीचे नुकसान : हस्त नक्षत्र मुळे शेतकरी चिंताग्रस्त 🔶🔶🔷🔷

सिटी बेल लाइव्ह / काशिनाथ जाधव : पाताळगंगा 🔷🔶🔶🔷

या वर्षी भात शेती उत्तम प्रकारे तयार झाली होती.शिवाय भाताच्या लोंब्यामध्ये दाणा तयार होण्याच्या स्थितीत असतांना उत्तरा नक्षत्रांनी उभे पिक आडवे पाडल्यामुळे शेतकरी वर्गांचे मोठे नुकसान झाले आहे.शिवाय गेले काही दिवस पाऊस पडत असल्यामुळे भात शेती मध्ये पाणी जमा झाले त्याचबरोबर पिके अडवी झाल्यामुळे काही पिके कुजली गेल्यामुळे मातीत टाकलेला पैसा वाया जात असल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.त्याच बरोबर २६ तारखेपासून हस्त नक्षत्र सुरु झाल्यामुळे शेतकरी वर्गांचे तोंडचे पाणी पळाले आहे.गेले दोन दिवस जरी पाऊस पडत नसले तरी सुद्धा हे नक्षत्र भात शेतीचे मोठे नुकसान करीत असतात.

              गेल्या काही वर्षात शेती करण्यास शेतकरी वर्ग पाठ फिरवत आहे.त्याच बरोबर मजुर खर्च, नांगरणी ,लागवड ते कापणी पर्यंत मोठा खर्च होत आहे.मात्र त्यांची पर्वा न करता काही शेतकरी वर्ग शेती करीत आहे. त्याच बरोबर शेतीची विभागणी झाल्यामुळे शेतीचे तुकड्यात रुपांतर झाले आहे.मात्र असे असुनही अल्प भुधारक शेतकरी शेती करीत आहे.मात्र लागवड झाल्यानंतर ते भात कापणी होइ पर्यंत शेतकरी वर्गांपुढे मोठे आवाहन असते.मात्र भाताच्या लोंब्यामध्ये दाणा तयार होण्याच्या मार्गावर असतांना दर वर्षी भात शेती पडत असते.यामुळे शेतकरी दर वर्षी मोठ्या आर्थिक संकटात सापडत असतो.

             त्याच बरोबर हस्त नक्षत्र, हे शेतकरी वर्गांसाठी मोठे मारक ठरत आहे.जवळ – जवळ या नक्षत्रामध्ये भाताच्या लोंब्यामध्ये दाणा तयार झालेला असतो.आणी यामुळे त्यांचे वजन वाढले गेल्यामुळे भात शेती पडत असते.शिवाय  शेतकरी वर्गांच्या मेहनतीवर पाणी फिरले जात असते.दोन दिवसापूर्वी सुरु झालेल्य हस्त नक्षत्र जरी कोरडे पडत असले तरी सुद्धा तो आपला रंग दाखविल्या शिवाय शांत बसणार नसल्याचे बळीराजाचे मत आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.