सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : 🔷🔶🔷🔶
रायगड लोकसभा मतदार संघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या कार्यप्रणालीवर खुश होवून आर.पी.आय आठवले गटाच्या खारघर येथील कार्यकर्त्यांनी खा. सुनील तटकरेंच्या उपस्थितीत राष्ट्वादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला. आरपीआय मधून राष्ट्वादीत आलेल्या उपस्थित सर्व प्रवेश कर्त्यांचे खा. सुनील तटकरे यांनी स्वागत केले व त्यांना राष्ट्वादी काँग्रेस पक्षात योग्य तो मान सन्मान दिला जाईल असे अभिवचन दिले.
सुतारवाडी येथील राष्ट्वादी काँग्रेस पक्ष कार्यालयात रायगड जिल्हा ओ.बी.सी.सेलचे अध्यक्ष गणेश पवार यांच्या माध्यमातून आज सकाळी हा राष्ट्रवादी पक्ष प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी रोहित पवार विचार मंचचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष सचिन वाघमारे, आर.पी.आय. (आठवले गट) खारघर शहर अध्यक्ष रोहित गायकवाड, सुयोग गायकवाड, प्रताप ठोंबरे, अतुल करडीले, मयूर जगताप, निलेश हजारे, विक्रांत नवगिरे, रोहित वालगुडे, अजय पाईकराव, हरिश नासारी आदि आरपीआय कार्यकर्त्यांनी राष्ट्वादी काँग्रेस पक्षात पक्षात प्रवेश केला. याचबरोबर खारघर परिसरात राष्ट्वादी काँग्रेस पक्ष संघटना वाढीसाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येऊन पक्ष संघटना बळकट करण्यात येईल असे आश्वासनही यावेळी या कार्यकर्त्यांनी खा. सुनील तटकरे यांना दिले.








Be First to Comment