Press "Enter" to skip to content

उरण मेडीकल वेल्फेअर असोसिएशनतर्फे आदिवासी बांधवांना औषधांचे वाटप

सिटी बेल लाइव्ह / उरण (प्रतिनिधी) 🔶🔶🔷🔷

उरण मेडीकल वेल्फेअर असोसिएशनतर्फे आज कोरोना पासून संरक्षण करण्यासाठी नागाव पिरवाडी वाडीवरील आदिवासी बांधवांना मेडिसीनचे वाटप करण्यात आले.

उरण परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे त्यापासून आपले संरक्षण करणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने उरण मेडीकल वेल्फेअर असोसिएशनतर्फे उरणमधील नागाव पिरवाडी वाडीवरील आदिवासी बांधवांना मास्क युमुन बुसटर मेडिसीनचे वाटप करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

सदर मास्क, युमुन बुसटरचे वाटप असोसिएशनचे पॅट्रन्स डॉ. सुरेश पाटील, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. मनोज भद्रे, असोसिएशनचे अध्यक्ष विकास मोरे, सेक्रेटरी डॉ. सत्या ठाकरे, डॉ. घन:श्याम पाटील, डॉ. संजीव म्हात्रे, डॉ. अजय कोळी, डॉ. प्रशांत बोन्द्रे, डॉ. अजय लहासे, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, प्रा. राजेंद्र मढवी, पत्रकार संघटनेचे अध्यक्ष घन:श्याम कडू, एएम न्यूज चॅनलचे प्रतिनिधी विरेश मोडखरकर, माजी सरपंच हरेश ठाकूर आदींच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जवळ जवळ २०० ते २५० आदिवासी बांधवांना मेडीसीनचे वाटप करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.