Press "Enter" to skip to content

भाजपा तर्फे स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती साजरी

सिटी बेल लाइव्ह / उरण (विठ्ठल ममताबादे) 🔷🔶🔶🔷


भारतीय जनता पार्टीचे जनक व संस्थापक स्व. पंडित दिन दयाळ उपाध्याय ह्यांच्या जयंती निमित्त व तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी ह्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण तालुक्यातील पिरकोन येथे स्व.पंडित दीनदयाळ उपाध्याय जयंती आणि वृक्षारोपण असे दोन्ही उपक्रम संयुक्तिक पणे साजरे करण्यात आले.भाजपा पिरकोनमधील कार्यकर्ते ह्यांनी उत्स्फूर्तपणे ह्या कार्यक्रमात सहभाग घेतला.

उरण तालुका उपाध्यक्ष मुकुंद गावंड, जेष्ठ कार्यकर्ते दीनकर म्हात्रे, ज्येष्ठ कार्यकर्ते पांडुरंग गावंड, सामाजिक कार्यकर्ते नरेश गावंड, ग्राम पंचायत सदस्य विनायक पाटील, ओबीसी सेलचे सचिव प्रमोद म्हात्रे , गजानन गावंड, कमलाकर गावंड, नितीन गावंड, वैभव गावंड , सुनील घरत , कु. प्रकाश गावंड , सुजित पाटील आणि असंख्य कार्यकर्ते ह्यांनी ह्या कार्यक्रमास उत्स्फूर्तपणे हजेरी लावली.

स्व. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती साजरी करण्याबरोबरच वृक्षारोपण करण्यात आले. या उपक्रमातून पर्यावरण वाचविण्याचा संदेश देण्यात आला .

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.