Press "Enter" to skip to content

ऑफ्रोटच्या राज्याध्यक्षांवरील गुन्हे मागे घ्या     

                 
रोहा तालुका शाखेचे तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना निवेदन 🔶🔷🔷🔶


 सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम) 🔶🔷🔷🔶 

ऑफ्रोट संघटनेचे राज्याध्यक्ष राजेंद्र मरस्कोल्हे यांच्यावरील गुन्हे मागे घ्यावेत, असे निवेदन संघटनेच्या वतीने गुरुवार दिनांक २४ सप्टेंबर रोजी तहसीलदार यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री व गृहमंत्री यांना देण्यात आले .                                             
 

संघटनेचे राज्याध्यक्ष राजेंद्र मरस्कोल्हे जातचोर बोगस आदिवासींविरुद्ध आवाज उठवून ४५ जमातींना सोबत घेऊन न्यायालयीन लढा लढत आहेत. त्या कारणाने बोगस आदिवासींना नोकरीवर पाणी सोडावे लागणार आहे. त्यामुळे त्यांनी मरसकोल्हेंवर बरेच षडयंत्र रचून ,खोटे आरोप करून, बोगस आदिवासींनी  हेतूपुरस्पर आणि आकसापोटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

या प्रकरणाची चौकशी करण्यात यावी त्यांच्याविरुद्धचे गुन्हे मागे घ्यावेत आणि खोटे आरोप करणाऱ्यांना कायद्यानुसार कारवाई करावी असे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुकाध्यक्ष अतुल खुपसे, सचिव भरत भांगरे, विनोद गावीत, चुनीलाल पाडवी, दत्तू कुलाळ, विजय शिद, नरेश इरनक, शरद तळपाडे, अबेसिंग गावीत, श्री. कचरे,एकनाथ पिचड इत्यादी आदिवासी बांधव उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.