सिटी बेल लाइव्ह / अजय शिवकर / वाशी : 🔷🔷🔶🔶
कोणतीही परवानगी नसताना कोरोना रुग्णांवर उपचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.ग्लोबल हेल्थ केअर, कुन्नूरे हॉस्पिटल आणि क्रिटी केअर सेंटर या रुग्णालयांना एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.
दंड : वाशीतील तीन नामांकित रुग्णालयांमध्ये सुरू असलेल्या या कारभाराची मनपा प्रशासनाने गंभीर दखल घेत, यातील एका रुग्णालयास 15 दिवस बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा बंद ठेवण्याचे आदेश दिले, तर उर्वरित दोन रुग्णालयांस एक लाखाचा दंड ठोठावला आहे.
विनापरवानगी : वाशीमध्ये ग्लोबल हेल्थ केअर कुन्नूरे हॉस्पिटल, क्रिटीकेअर सेंटर आणि पामबीच हॉस्पिटल ॲण्ड डायग्नोस्टिक सेंटर या तीन रुग्णालयांत विनापरवानगी उपचार सुरू असल्याची बाब समोर आली.
नोटीस : कोरोना संसर्ग आणि रुग्णांची प्रकृती पाहता महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी या तीनही रुग्णालयांना नोटीस बजावल्या होत्या.
15 दिवस बंद : नोटीसीला वेळेत उत्तर न दिल्याने आयुक्तांनी पामबीच हॉस्पिटल ॲण्ड डायग्नोस्टिक सेंटर या रुग्णालयातील बाह्यरुग्ण व आंतररुग्ण सेवा 15 दिवस बंद ठेवण्याचे आदेश दिले.







Be First to Comment