Press "Enter" to skip to content

उरणमध्ये आज २७ पॉझिटीव्ह


सिटी बेल लाइव्ह / उरण (घन:श्याम कडू) 🔷🔶🔶🔷

आज उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्ह २७ जण सापडले आहेत. ४ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले. आज कोणीही मयत नाही.
आज एकूण पॉझिटीव्ह १८३७, उपचार करून बरे झालेले १५३३, उपचार घेणारे २१५, मयत ८९ असल्याची माहिती तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली.

आज भेंडखळ १, बोकडविरा ३, वशेणी ३, नेव्हल स्टेशन करंजा २, ओम अपार्टमेंट जरीमरी मंदिरासमोर १, केगाव १, भवरा २, नवघर २, विनायक केगाव १, बोरी पानसरे आळी १, शिवकृपा अपार्टमेंट उरण १, कोप्रोली १, एअर फोर्स स्टेशन शेवा १, पिरकोन १, बोरी १, उरण १, बाजारपेठ १, म्हातवली १, वैभव लक्ष्मी अपार्टमेंट १, नागाव १ असे एकूण २७ जण पॉझिटीव्ह आढळले आहेत. कातकर वाडी विंधणे १, नेव्हल स्टेशन करंजा २, करंजा नवापाडा १ असे एकूण ४ जणांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. आज कोणीही मयत नाही.

उरणमध्ये कोरोना पॉझिटीव्हचा आकडा वाढू लागला आहे. तर उपचार करून घरी परतण्याचा आकडा कमी येत आहे. त्यामुळे उरणच्या जनतेने आपली काळजी घेणे आवश्यक बनले आहे.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.