Press "Enter" to skip to content

कोरोना योद्ध्यांच्या सन्मानाने प्रसाद सावंत यांचा वाढदिवस साधेपणाने साजरा

सिटी बेल लाइव्ह / माथेरान / मुकुंद रांजाणे : 🔷🔶🔶🔷

सर्वत्रच कोरोना या महाभयंकर आजाराने सर्वांना ग्रासले असून सध्याचा सुरू असलेला पाच महिन्यांपासूनचा काळ हा दुःखद आहे. या आजाराने माथेरान या छोट्याशा गावामधील काही जवळचे मित्र कोरोना आजाराशी लढताना उपचारा दरम्यान ही लढाई लढताना अपयशी ठरले आणि त्यांना मृत्यूने कवटाळले आहे त्यामुळेच माथेरान मध्ये एकप्रकारे दुःखाचे सावट असल्याने नगरपरिषद गटनेते प्रसाद सावंत यांचा वाढदिवस अगदी साधेपणाने साजरा करण्याचे प्रसादभाई मित्र परिवार यांनी ठरवले.

त्याप्रमाणे वाढदिवशी ज्या ज्या कोरोना योद्ध्यांनी या कठीण प्रसंगी दिवसरात्र मेहनत घेऊन काम करीत आहेत. तर काही योद्धे सुद्धा तितक्याच जबाबदारीने आपले कर्तव्य पार पाडत आहेत अशांचा आभारपत्र देऊन उचित सन्मान करणे आवश्यक होते.त्यानुसार या मित्र परिवाराने नगरपरिषद दवाखान्यात कार्यरत असलेले वैद्यकीय अधिकारी, नर्स, पोलीस निरीक्षक, नगरपरिषद मुख्याधिकारी यांना हे आभारपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

तर घनकचरा व्यवस्थापन कर्मचारी, सफाई कामगार, पत्रकार, विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणारे योद्धे यांनाही हे आभारपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

या वाढदिवसाचे औचित्य साधून महात्मा गांधी मार्गावर अनेक वृक्षांची लागवड सुध्दा करण्यात आली आहे. यावेळी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत, आजी माजी पदाधिकारी, युवा वर्ग तसेच नागरिक मोठया संख्येने सोशल डिस्टनिंग ठेऊन उपस्थित होते.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.