सिटी बेल लाइव्ह / गोवे-कोलाड (विश्वास निकम) 🔶🔷🔶🔷
मेत्ता (ABCPR) लेणी संवर्धन या संघटनेकडून ग्रामीण दुर्गम भागामध्ये धान्य किट चे वाटप करण्यात आले हे धान्य किट नागशेत कोंडी, नाडसूर, पाच्छापुर, ठाणाळेवाडी येथील बांधवांना वाटण्यात आले.
मेत्ता संघटनेचे प्रमुख मा. सुदर्शन साळवे यांच्या संकल्पनेत गरजू घटकापर्यंत जास्तीत जास्त लोकांना ही मदत पोहोचविणे असा आहे त्याप्रमाणे ही मदत देण्यात आली. गोरगरिबांना ही मदत मिळावी यासाठी आर.पी.आय चे सुधागड तालुका उपाध्यक्ष राहुल महाडिक यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच आर.पी.आय तालुका कार्याध्यक्ष भगवान शिंदे, त्याचप्रमाणे राहुल शिंदे, राजेश महाडिक, महेश डिंगळे, दिपक भालेराव, रवींद्र भालेराव, अक्षय डिंगळे, बबन फाटे, ठाणाळेवाडीचे अध्यक्ष संदिप पवार, गोपीनाथ काटकर, काळू पवार, यशवंत पवार, शिमग्या मोरे, मंगेश ढेबे आदींचे सहकार्य मोलाचे होते.
या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक पाली तहसिलदार मा. दिलीप रायन्नावर यांनी केले. यावेळी सुधागड तालुका आर.पी.आय. चे उपाध्यक्ष श्री राहुल महाडिक यांनी सांगितले की COVID-19 या काळामध्ये जिल्ह्यातील ग्रामीण भागात आदिवासी वाड्यात किंवा बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी काही संघटनांकडून किंवा सरकारी उपाय योजना उदरनिर्वाहासाठी मदत म्हणून पुढे यावेत जेणेकरून कोरोना या जागतिक महामारीच्या लॉकडाऊन मध्ये गरिबांपर्यंत मदत मिळू शकेल आणि त्यांच्या कुटुंबांना अन्ना पासून वंचित राहणार नाहीत. आर.पी.आय चे सुधागड तालुका उपाध्यक्ष श्री राहुल महाडिक हे सुधागड तालुक्यात अत्यंत महत्त्वाचे सामाजिक कार्य करत असल्यामुळे अनेकांनी त्यांना धन्यवाद दिले.








Be First to Comment