Press "Enter" to skip to content

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आरोग्यदायी उपक्रम

मास्क, सॅनिटायझर व औषधाचे वाटप 🔷🔶🔶🔷

सिटी बेल लाइव्ह /पनवेल (प्रतिनिधी) 🔷🔷🔶🔶

भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत मोलाचे योगदान देणारे थोर व्यक्तिमत्व, एकात्म मानववादाचे प्रणेते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त नवीन पनवेल येथे मोफत मास्क, सॅनिटायझर व औषध वाटप करण्यात आले. भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते हा आरोग्यदायी उपक्रम राबविण्यात आला.
           

या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर तसेच नमो नमो उत्तर भारतीय मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आर.के.दिवाकर,  संघटनमंत्री सुशील जोशी, प्रदेश उपाध्यक्ष संतोषकुमार शर्मा, आदी उपस्थित होते. या वेळी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. 

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.