सिटी बेल लाइव्ह / रसायनी–राकेश खराडे 🔶🔷🔷🔶
कोन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच आशा अशोक घरत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या कोन ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदासाठी सरपंच निलेश म्हात्रे व प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवक रमेश तारेकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपसरपंच पदाची निवडणूक ग्रामपंचायत कार्यालयात पार पडली.
यावेळी उपसरपंच पदासाठी शेकापच्या अनुषा अशोक म्हात्रे यांचा एकमेव अर्ज आल्याने प्रशासकीय निवडणुक अधिकारी ग्रामसेवक रमेश तारेकर यांनी अनुषा अशोक म्हात्रे यांची उपसरंचपदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी कार्यांलयाबाहेर जमलेल्या नागरिकांनी जल्लोष करीत फटाक्यांची आतषबाजी केली.यावेली सरपंच निलेश म्हात्रे,दीपक म्हात्रे,जितेश शिसवे,आशा घरत, शशिकला घरत,दिपिका कांबळे,घन:श्याम पाटील,जगन्नाथ सार्डेकर,ताईबाई पाटील,महेश माळी आदी ग्रामपंचायत कमिटीसह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी सोशल डिस्टिंक्शनचे तंतोतंत पालन करण्यात आले.तसेच शंभो शिसवे,संजय म्हात्रे, प्रवीण घरत, नामदेव गाताडे,दीपक कांबळे,अनिल भोपी,आशा अनिल भोपी,नारायण घरत,आदेश घरत,अरुण म्हात्रे,चंद्रकांत कोरडे, द्वारकानाथ तांडेल,हभप धर्माबुवा शिसवे,रवींद्र म्हात्रे,जितेश कांबळे,महेंद्र म्हात्रे,भूषण पाटील, अनंत म्हात्रे,हभप रामदासबुवा म्हात्रे,रघुनाथ म्हात्रे,प्रदीप कोंडीलकर,नामदेव केणी आदींनी पुष्पगुच्छ देऊन नवनिर्वाचित उपसरपंच अनुषा म्हात्रे यांचे आभार मानले.








Be First to Comment