Press "Enter" to skip to content

माथाडी नेते स्व.अण्णासाहेब पाटील यांची जयंती नागोठण्यात साजरी

सिटी बेल लाइव्ह / नागोठणे (महेश पवार) : 🔷🔶🔶🔷

रोहा तालुका माथाडी कामगार संघटनेच्या वतीने नागोठणे येथे माथाडी कामगार नेते, श्रमिकांचे भाग्य विधाते व अखिल भारतीय मराठा महासंघाचे संस्थापक स्व. अण्णासाहेब पाटील यांची जयंती रोहा तालुका माथाडी कामगार संघटनेचे रोहा तालुका अध्यक्ष संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच तालुका उपाध्यक्ष दिनेश घाग यांच्या पुढाकाऱ्याने साजरी करण्यात आली.

यावेळी नागोठणे शहर व परिसरातील सर्व माथाडी कामगार उपस्थित होते.
यावेळी दिनेश घाग यांनी सांगितले की, स्व. अण्णासाहेब पाटील यांनी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लावलेल्या माथाडी रोपट्याचे आज वटवृक्षात रुपांतर झाले आहे. त्याचाच एक भाग म्हणून नागोठणे येथील माथाडी कामगार संघटना रोहा तालुक्यात जोमाने काम करीत आहे.

आम्ही माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी माथाडी कामगारांच्या न्याय हक्कासाठी कटिबद्ध असल्याचे शेवटी दिनेश घाग यांनी सांगितले. यावेळी स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन त्यांना सामूहिकरित्या अभिवादन करण्यात आले.

Be First to Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Mission News Theme by Compete Themes.